प्रशांत किशोर भेटीवर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

मुंबई : देशात भाजपच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची योजना असून, त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षाच्या वतीने शनिवारी स्पष्ट करण्यात आले. विरोधकांची व्यापक आघाडी करण्यावरही राष्ट्रवादीने भर दिला आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. त्यावरून विविध तर्क वितर्कांना उधाण आले असताना राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते  नवाब मलिक यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत ही भेट झाल्याचे स्पष्ट के ले.

देशात बिगर भाजप पक्षांचा पर्याय निर्माण करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी वारंवार व्यक्त केली आहे. पश्चिाम बंगाल निवडणुकीपूर्वीही पवारांनी तसे मतप्रदर्शन के ले होते. भाजपला सशक्त पर्याय उभा राहावा हीच शरद पवार यांची योजना आहे. यासाठी राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे मलिक यांनी सांगितले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत बिगर भाजप पक्षांचे नेतृत्व शरद पवार हे करतील, असे राष्ट्रवादीने सूचित के ले आहे.

राज्यातील राष्ट्रवादीची रणनीती ठरविण्याची जबाबदारी प्रशांत किशोर यांच्यावर सोपविण्यात येणार नसल्याचेही मलिक यांनी स्पष्ट केले.

देशातील राजकीय परिस्थितीबाबत प्रशांत किशोर यांना चांगला अनुभव आहे. या संदर्भात पवारांनी किशोर यांच्याशी चर्चा के ली. सारे विरोधक एकत्र आल्यास भाजपला सशक्त पर्याय उभा राहू शकतो. या दृष्टीनेच नियोजन सुरू असल्याचे मलिक यांनी स्पष्ट के ले.