News Flash

संपूर्ण मुंबईत अतिदक्षता विभागात २३ बेड तर व्हेंटिलेटरचे केवळ ५ बेड शिल्लक!

संदीप आचार्य मुंबईतील वाढता करोना लक्षात घेऊन महापालिकेने रुग्णव्यवस्थापन युद्ध पातळीवर वाढविण्यास सुरुवात केली असली तरी मुंबईतील करोनाच्या सर्व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आता केवळ २३

प्रातिनिधिक छायाचित्र

संदीप आचार्य

मुंबईतील वाढता करोना लक्षात घेऊन महापालिकेने रुग्णव्यवस्थापन युद्ध पातळीवर वाढविण्यास सुरुवात केली असली तरी मुंबईतील करोनाच्या सर्व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आता केवळ २३ बेड शिल्लक आहेत तर व्हेंटिलेटरचे ५ बेड शिल्लक आहेत. महापालिका प्रशासनासाठी जशी ही परिस्थिती चिंताजनक आहे, तशीच बेडसाठी चिंताक्रांत असलेल्या रुग्णांसाठी धक्कादायक परिस्थिती आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आधी महापालिकेने जम्बो रुग्णालयांचा पसारा आवरता घेतला होता तर संपूर्ण कोविड रुग्णालयात रुपांतर केलेल्या नायर रुग्णालयाचे पुन्हा सामान्य रुग्णालयात रुपांतर केले होते. जसजशी दुसरी लाट येणार हे स्पष्ट होऊ लागले तसे पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी वेगाने पावले उचलून करोना रुग्णांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा रुग्णव्यवस्था उभी करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला कामाला लावले. दुसऱ्या लाटेपूर्वी मुंबईत ४०० ते ५०० रुग्ण होते. ते वेगाने वाढत रोज हजार दोन हजार होऊ लागले. त्यानंतर मुंबईतील करोना रुग्णसंख्येने कमाल मर्यादा गाठत दहा हजाराचा आकडा गाठला.

राज्यात आणखी दोन ते तीन दिवस ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा जाणवणार!

पालिकेने उभे केले २० हजार ३०९ बेड!

गेल्या काही दिवसांत रोज आठ ते नऊ हजार रुग्ण आढळून येत आहेत. महापालिकेने यासाठी रुग्णालयातील बेडची संख्या वेगाने वाढवायला सुरुवात केली. सुरुवातीला १२ हजारच्या आसपास असलेली बेडची संख्या वाढवून आयुक्त चहल यांनी संपूर्ण मुंबईतील १५३ रुग्णालयात मिळून एकूण २०,३०९ बेडची व्यवस्था निर्माण केली. यासाठी महापालिकेच्या रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याबरोबरच जम्बो रुग्णालय आणि खासगी रुग्णालयातील बेडही मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतले. आज जवळपास खाजगी रुग्णालयातील चार हजाराहून अधिक बेड ताब्यात घेण्यात आले असले तरी अतिदक्षता विभागात व व्हेंटिलेटरचे बेड मिळणे हे आव्हान निर्माण झाले आहे.

bed shortage in mumbai

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची गंभीर परिस्थिती!

मुंबईतील एकूण २०,३०९ बेडपैकी आज रात्री ८.३० पर्यंत ४०९८ बेड रिकामे आहेत. मात्र अतिदक्षता विभागात असलेल्या एकूण २६७३ बेडपैकी केवळ २८ बेड शिल्लक आहेत. यातील नॉन व्हेंटिलेटरच्या १२८० बेडपैकी केवळ २३ बेड रुग्णांसाठी रिकामे आहेत तर व्हेंटिलेटरचे केवळ ५ बेड शिल्लक आहेत. आज सकाळी १०.३० वाजता चित्र गंभीर होते. अतिदक्षता विभागात केवळ १५ बेड होते तर व्हेंटिलेटरचे ‘शून्य’ बेड होते. याचा दुसरा अर्थ यातील काही रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे काही बेड रात्री उपलब्ध झाल्याचे पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

धक्कादायक : पुण्यातील ससून रुग्णालयात एका बेडवर दोघांवर उपचार सुरू

आज राज्यात ६३,७२९ नवीन करोना रुग्ण आढळून आले तर ३९८ जणांचे मृत्यू झाले. मुंबईत ८८०३ नवीन रुग्ण आढळून आले असून ५३ जणांचे मृत्यू झाले आहेत. नव करोनामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत असून रुग्ण बरे होण्याचे राज्यातील प्रमाणही आता ८१.१२ टक्यांवर आले आहे. यापूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त होते. महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मिळून आजच्या दिवशी ४०९८ बेड रिकामे असले तरी यातील बहुतेक बेड हे जम्बो रुग्णालयात आहेत. खाजगी व पंचतारांकित रुग्णालयात रुग्णांना जवळपास बेड उपलब्ध नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. पालिकेच्या गोरेगाव येथील नेस्को व बीकेसीतील जम्बो केंद्रात तसेच पालिकेच्या रुग्णालयात बहुतेक बेड उपलब्ध असले तरी तेथेही अतिदक्षता विभागात तसेच व्हेंटिलेटरचे बेड उपलब्ध नाहीत, हे कटू असले तरी वास्तव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 9:18 pm

Web Title: bmc shortage of oxygen ventilator beds commissioner iqbal singh chahal pmw 88
टॅग : Corona
Next Stories
1 लोकल प्रवासाविना चार हजार एचआयव्ही रुग्णांची औषधासाठी तडफड!
2 ‘रेमडेसिवीर’चा OLX वरही काळाबाजार; अंधेरीतल्या व्यक्तीकडून विक्री
3 ‘हाफकीन’च्या सहा लाख रेमडेसिवीर खरेदीच्या निविदेला शून्य प्रतिसाद!
Just Now!
X