News Flash

मोदींवर टीका करताना मॉर्फ फोटोचा वापर, कॉमेडियन कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई?

मॉर्फ केलेला फोटो मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी वापरल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला फटकारले आहे.

कुणाल कामरा

मुंबईतील फिरोज जीजीभॉय टॉवर्सचा मॉर्फ केलेला फोटो मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी वापरल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला फटकारले आहे. बीएसईच्या इमारतीचा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरल्याने त्याच्याविरोधात कारवाई करणार असल्याचंही त्यांनी ट्विटरवर स्पष्ट केलं आहे.

कुणाल कामरा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करत आहे. १४ एप्रिल रोजी त्याने चार वेगवेगळे फोटो शेअर करत हे ‘हे फोटो म्हणजे मोदींनी दिलेली आश्वासनं,’ अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्यातच एक बीएसईच्या इमारतीचाही फोटो आहे. यावर आक्षेप घेत बीएसईने ट्विट केले, ‘एका राजकीय पक्षाविरोधात बीएसई इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो कुणाल कामराने वापरला आहे. अशा कृतीसाठी इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो वापरणे बेकायदेशीर आहे. कुणाल कामराविरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी बीएसईकडे अधिकार आहेत.’

कुणाल कामराने बीएसईच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले. ‘हा निव्वळ विनोद आहे. विनोदाचा सेन्सेक्स बऱ्याच अंकांनी घसरला आहे. बरं जेलमध्ये वायफाय सुविधा असते का?,’ असं उपरोधित उत्तर कुणालने दिलं. आता बीएसई कुणालविरोधात कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कुणाल कामरा सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे. मोदींविरोधातील विनोद आणि स्टँडअप कॉमेडीमुळे तो प्रकाशझोतात आला. त्याच्या ट्विटर अकाऊंटवरही ‘मोदींना मत देऊ नका’ हे ट्विट पिन केलेलं पाहायला मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:03 pm

Web Title: bombay stock exchange slams comedian kunal kamra for using its morphed picture to attack pm modi
Next Stories
1 विकी कौशलला शूटिंगदरम्यान दुखापत, पडले १३ टाके
2 चित्र रंजन : बडा घर पोकळ वासा..
3 ‘बधाई हो’ फेम नीना गुप्ता यांनी करण जोहर, शाहरुखला का म्हटले स्वार्थी आणि फालतू?
Just Now!
X