मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन धावणार की नाही, असा प्रश्न असतानाच या प्रकल्पातील वांद्रे ते कुर्ला संकुल (बीकेसी) स्थानक उभारणीसाठी येत्या १९ फेब्रुवारीला निविदा खुली होणार आहे; परंतु या भागात असलेले बीपीसीएलचे (भारत पेट्रोलियम कॉपरेरेशन लिमिटेड) पेट्रोल पंप आणि करोना केंद्रामुळे जागेचा तिढा निर्माण झाला असून निविदा पुढे ढकलावी की खुली करावी, असा प्रश्न ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशन’ला पडला आहे; परंतु या हालचालींमुळे मुंबईतून बुलेट ट्रेन धावणार हे निश्चित झाले आहे.

ठाणे ते दिवालगतच्या म्हातार्डी भागांत बुलेट ट्रेनच्या स्थानक उभारणीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव डिसेंबर २०२० मध्ये ठाणे महानगरपालिके च्या महासभेत गुंडाळला होता. त्यानंतर या प्रकल्पाला जागा मिळाली, तरच महाराष्ट्र व गुजरातमधून बुलेट ट्रेन धावेल. अन्यथा पहिल्या टप्प्यातून गुजरातमधूनच बुलेट ट्रेन चालवू शकतो का हे पाहण्यात येईल, असे तत्कालीन रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी स्पष्ट केले होते. यानंतरही प्रकल्पाला मुंबईत गती देण्यासाठी हायस्पीड रेल्वे कॉपरेरेशनने प्रयत्न चालवले आहेत. बुलेट ट्रेन मार्गिके तील सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे ते कुर्ला संकुल येथे स्थानक उभारण्यात येणार आहे. या कामासाठी १९ फेब्रुवारी २०२१ ला निविदा खुली केली जाणार आहे. निविदा खुली झाल्यानंतर अन्य प्रक्रि या पूर्ण करून स्थानक उभारणीसाठी काम सुरू होईल. यासंदर्भात कॉपरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी निविदा खुली होईल की नाही हे सांगता येणे कठीण असल्याचे सांगितले. बीके सीमध्येच ‘भारत पेट्रोलियम कॉपरेरेशन लिमिटेड’चे पेट्रोल पंप आहे. शिवाय करोना

केंद्रही आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असून त्याबाबत निर्णय लवकरच न झाल्यास निविदा खुली करण्याची प्रक्रि या पुढे ढकलण्यात येईल. आठवडाभरात निर्णय घेऊ, असे खरे यांनी स्पष्ट केले.

* नॅशनल रेल्वे हायस्पीड रेल कॉपरेरेशन‘कडून मुंबई ते अहमदाबाद प्रकल्पात स्टीलचे २८ मोठे पूल बनवण्याचे कामही  देण्यात आलेले आहे.

*  गुजरातमध्ये १६ , महाराष्ट्रात ११ व दादरा-नगर हवेली येथे एक पूल बांधला जाणार आहे.