मध्य रेल्वेवरील वाहतूक सोमवारी दुपारी विस्कळीत झाली असून कसारा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेवर कसारा स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल गाड्या व लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईकडे येणारी वाहतूक बंद असून कसाराच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघांडामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार सुरुच असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यात तांत्रिक बिघाडाचे सत्रही सुरुच असल्याने प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway local train service disrupted signal failure at kasara
First published on: 23-07-2018 at 15:51 IST