News Flash

उद्धव ठाकरेंनी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या, ठाण्याच्या आयुक्तपदी विजय सिंघल

गुरुवारी दिले बदल्यांसंदर्भातील आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल तर नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या नवीन नियुक्त्या खालीलप्रमाणे

ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून रणजित कुमार यांनी नेमणूक करण्यात आली आहे.

एमजी अर्दड यांनी नियुक्ती औरंगाबाद विभागाच्या मृद व जलसंधारण आयुक्तपदी करण्यात आली आहे.

एल. एस. माळी यांची मुंबई विभागातील ग्रामविकास विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यु. ए. जाधव यांच्या आदेशात अंशत: बदल करुन त्यांना ग्रामविकास विभाग मुंबईच्या उपसचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

अभिजीत बांदर यांच्या बदलीच्या आदेशातही अंशत: बदल करण्यात आला आहे. बांगर यांनी नियुक्ती नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त पदी करण्यात आली आहे.

मुंबई विभागाचे माहिती तंत्रज्ञान संचालक मदन नागरगोजे यांची नियुक्ती मुंबई विभागातील विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या सहसचिव पदी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 5:46 pm

Web Title: cm uddhav thackeray ordered 7 ias officer transfer scsg 91
Next Stories
1 सलाम! आई ICU मध्ये असूनही करोनाग्रस्तांसाठी झटत आहेत आरोग्यमंत्री राजेश टोपे
2 Coronavirus : बोगस आणि खरं सॅनिटायझर कसं ओळखाल?
3 Coronavirus: हातावर क्वारंटाईनचा शिक्का असतानाही मुंबई सेंट्रलला ते सहा जण ट्रेनमध्ये चढले आणि…
Just Now!
X