News Flash

यूपीएससी पूर्व परीक्षेचे वेळापत्रक रखडल्याने संभ्रम

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरवर्षी हे वेळापत्रक डिसेंबर महिन्यातच जाहीर होते. मात्र, यंदा अभ्यासक्रम

| February 3, 2013 02:38 am

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्व परीक्षेचे वेळापत्रक शनिवारी जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दरवर्षी हे वेळापत्रक डिसेंबर महिन्यातच जाहीर होते. मात्र, यंदा अभ्यासक्रम बदलणार असल्याने पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकले नसल्याचे समजते. येत्या आठवडाभरात हे वेळापत्रक संकेतस्थळावर टाकले जाण्याची शक्यता आहे. राज्यातून यूपीएससीच्या परीक्षेसाठी सुमारे एक लाख विद्यार्थी बसत असतात. दरवर्षी पूर्वपरीक्षेचे वेळापत्रक डिसेंबर महिन्यातच जाहीर होते. मात्र, यंदा हे वेळापत्रक २ फेब्रुवारीला जाहीर होणार होते. परंतु यूपीएससीच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बदलणार आहे. अभ्यासक्रम बदलण्याचे हे काम वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने पूर्व परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होऊ शकले नसल्याचे समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2013 2:38 am

Web Title: confusion due to upsc pre examination time table delay
टॅग : Delay,Time Table,Upsc
Next Stories
1 दर्जेदार शिक्षकांचा अभाव हीच खरी राष्ट्रीय आपत्ती- डॉ. माशेलकर
2 चित्रपटसृष्टीच्या शतसांवत्सरिक वर्षांनिमित्त राज्य शासनाच्या विविध योजना जाहीर
3 ऑनलाइन फसवणुकीचे पैसे बँकेकडून परत
Just Now!
X