काँग्रेस सावरकरविरोधी नाही असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होते आहे या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग यांनी केलेलं हे वक्तव्य मोठं आणि तितकंच महत्त्वाचं आहे यात काहीही शंका नाही. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या तेव्हा त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण केलं होतं ही आठवणही मनमोहन सिंग यांनी सांगितली. भारतरत्न कुणाला द्यायचं हे एक समिती ठरवते, काँग्रेस सावरकरविरोधी नाही असं वक्तव्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेसला आदर आहे. मात्र त्यांच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मतभेद आहेत असंही मनमोहन सिंग यांनी सांगितलं. भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यात सावरकरांना भारतरत्न देण्याचं आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, “सावरकरांना भारतरत्न दिलं जावं यासाठी आपलं सरकार केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे”. या पार्श्वभूमीवर मुंबईत आलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे, काँग्रेस सावरकरविरोधी नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा : महात्मा गांधी यांच्या हत्येच्या कटात सावरकारांचे नाव- दिग्विजय सिंह

याच पत्रकार परिषदेत मनमनोहन सिंग यांना अनुच्छेद ३७० बाबतही प्रश्न विचारण्यात आला. ज्याबाबत मनमोहन सिंग म्हणाले, ” आम्ही अनुच्छेद ३७० हटवण्याच्या विरोधात नाही, त्याची अंमलबजावणी ज्या प्रकारे करण्यात आली त्याला आम्ही विरोध दर्शवला. अनुच्छेद ३७० हटवणं हे काश्मीरच्या जनतेला दिलासा देणारं आहे मात्र त्याची अंमलबजावणी ज्या प्रकारे झाली ती पद्धत चुकची होती” असंही मनममोहन सिंग यांनी म्हटलं आहे.