09 April 2020

News Flash

आठ खासगी प्रयोगशाळांत करोना तपासणी

देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता

संग्रहित छायाचित्र

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशातील २७ खाजगी प्रयोगशाळांना करोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी सर्वाधिक म्हणजे आठ प्रयोगशाळा किंवा लॅब या महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. या खाजगी तपासणी केंद्रांना केंद्र शासनाने ‘करोना तपासणी केंद्र’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्र शासनाकडे करण्यात आली होती.

या आठ लॅब

थायरोकेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, नवी मुंबई, सबर्बन डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड, मुंबई, सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, नवी मुंबई, एस. आर. एल. लिमिटेड, मुंबई, ए.जी. डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल लॅबरोटरी, मुंबई आणि इन्फेक्शन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे या खासगी लॅबचा यात समावेश आहे. यामुळे करोना तपासणी अधिक जलद गतीने होऊ शकेल आणि रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होतील. ही तपासणी केंद्रे पूर्ण क्षमतेने चालविल्यास दररोज एकूण २ हजार संशयित रुग्णांचे नमुने तपासणी करणे शक्य होणार आहे, अशी माहितीही देशमुख यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:03 am

Web Title: corona testing in eight private laboratories abn 97
Next Stories
1 करोनाच्या धास्तीने खासगी दवाखान्यांची रुग्णांकडे पाठ
2 काँग्रेसमधील फाटाफूट येडियुरप्पा, शिवराजसिंह यांच्या पथ्यावर
3 मध्य प्रदेशात सत्ताबदल होताच दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या!
Just Now!
X