६७,१६० नवे रुग्ण, ६७६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात लागोपाठ चौथ्या दिवशी ६७ हजार नवे रुग्ण आढळले. नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त असले तरी ही संख्या गेल्या चार दिवसांत स्थिरावणे तेवढेच दिलासादायक असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मुंबईतील रुग्णसंख्याही तुलनेत घटली आहे.

गेल्या २४ तासांत करोनाचे ६७,१६० नवे रुग्ण आढळले असून, ६७६ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ६ लाख ९४ हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत. सर्वाधिक १ लाख ८ हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत. मुंबई शहरातील नवे रुग्ण आढळण्याची तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली आहे.

दिवसभरात मुंबई ५८८८, नाशिक शहर २८७५, उर्वरित नाशिक जिल्हा १८८१, नगर जिल्हा ३५४७, जळगाव ९४१, पुणे शहर ४११८, पिंपरी-चिंचवड २४३१, उर्वरित पुणे जिल्हा ३४७६, सातारा १९१२, सोलापूर १७७८, सांगली १३०५, औरंगाबाद जिल्हा १६८४, लातूर १३६३, यवतमाळ १४२७, नागपूर शहर ५४१७, उर्वरित नागपूर जिल्हा २६१६, चंद्रपूर १७४२ नवे रुग्ण आढळले.

मृतांमध्ये मुंबई ७१, ठाणे जिल्हा २६, रायगड २०, नाशिक विभाग ८२, पुणे विभाग ९४, मराठवाडा १५३, विदर्भ १८५ जणांचा समावेश आहे.