28 February 2021

News Flash

नवीन आदेश: मुंबईतील दुकानं उघडी ठेवण्यासंदर्भात घेण्यात आला हा निर्णय

मुंबई महापालिकेकडून दुकानदारांना दिलासा

संग्रहित छायाचित्र

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउन शिथील केला जात असून राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली असून दुकानांना आता नियमित वेळेप्रमाणे सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मुंबई महापालिकेकडून यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र यावेळी काही अटींचा उल्लेख करण्यात आला आहे.

आदेशात सांगण्यात आल्याप्रमाणे सर्व मार्केट, मार्केट परिसर, दुकानं पूर्ण वेळ सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यामधून मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सला वगळण्यात आलं आहे. यावेळी मुंबई महापालिकेने काही अटींचा उल्लेख केला आहे.

त्यानुसार, राज्य सरकारने याआधी लावलेला सम-विषयचा नियम कायम ठेवला आहे. रस्ते, गल्ली, परिसरात असणारी रस्त्याच्या एका बाजूची दुकानं पूर्ण दिवस नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील. तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकानं उघडी असतील. नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं यासाठी मार्केट तसंच दुकान मालकांनी सहभागी होऊन योग्य ती व्यवस्था करावी तसंच सोशल डिस्टन्सिंग आणि वाहतुकीची व्यवस्था करावी असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 1:43 pm

Web Title: coronavirus lockdown bmc allow shops to function full working hours sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शिवसेना नगरसेवकाचा करोना व्हायरसमुळे मृत्यू
2 धक्कादायक! रुग्णालयातून बेपत्ता वृद्धाचा मृतदेह सापडला बोरिवली रेल्वे स्थानकात
3 संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता सोनू सूद म्हणतो…
Just Now!
X