21 October 2020

News Flash

ड्रग्ज प्रकरण : दीपिका पदुकोणच्या मॅनेजरला एनसीबीने बजावले समन्स

चॅटमधून दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचं नाव आलं समोर

अभिनेत्री दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) समन्स बजावले आहेत. ड्रग्ज प्रकरणी दीपिकाच्या मॅनेजरला समन्स बजावण्यात आले आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलबाबत एनसीबी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर या तपासात आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं समोर आली. सुशांतची मॅनेजर जया साहाच्या चौकशीदरम्यान दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशचंही नाव समोर आलं. करिश्मासोबतच KWAN टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव चितगोपेकर यांनासुद्धा चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

एनसीबी सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदी आणि टॅलेंट मॅनेजर जया साहा यांची चौकशी करत आहे. जया साहाच्या चॅटमधून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं उघड झाली आहेत. दीपिकाची मॅनेजर करिश्मा आणि जया यांच्यात ड्रग्सविषयी बोलणं झाल्याचं चॅटमधून उघडकीस आल्याचं म्हटलं जातंय.

रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांच्या अटकेनंतर एनसीबीने आता ड्रग्ज प्रकरणातील अन्य लोकांचीही चौकशी करण्याची तयारी केली आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. व्हॉट्स अॅप चॅटमध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 3:05 pm

Web Title: deepika padukone manager karishma prakash summoned in drugs probe by ncb ssv 92
Next Stories
1 रिया चक्रवर्तीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
2 ड्रग्स प्रकरण : दीपिकानंतर नम्रता शिरोडकरचं नाव समोर
3 सविनय कायदेभंग : मनसे नेते संदीप देशपांडेंसह चार जणांना अटक
Just Now!
X