राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार वाय. पी. त्रिवेदी यांच्या खासदार निधीतून ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विकास कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पत्र लिहून केली आहे.
त्रिवेदी यांच्या खासदार निधीतून गोरेगावच्या विकास कामांकरिता ४० लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, त्यातून कोणतीही विकास कामे झाली नाहीत. उलट बोरिवली, विक्रोळी या ठिकाणी बांधण्यात आलेली शौचालये, बालवाडी, लादीकरण आदी कामांची खोटी छायाचित्रे लावून निधीवर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराच्या मदतीने डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले होते. लोकसत्ताने या गैरव्यवहाराला वाचा फोडली होती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2015 रोजी प्रकाशित
‘गायब’ कामांच्या चौकशीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार वाय. पी. त्रिवेदी यांच्या खासदार निधीतून ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांनी केलेल्या विकास कामांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे पत्र लिहून केली आहे.

First published on: 22-03-2015 at 03:24 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former ncp mp yp trivedi mhada redevelopment project scam