03 June 2020

News Flash

हाजी अराफत शेख यांचे मत हे पक्षाचे अधिकृत मत नाही- नीलम गोऱ्हे

शिवसेनेची भूमिका आहे की मंदीर असो किंवा दर्गा, मशीद महिला पुरूष व सर्वांनाच समान अधिकार असावेत.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी हाजी अली दर्ग्यात प्रवेश केल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ असा इशारा शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांनी आज दिला. त्यावर ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून शिवसेने पक्षाची ही अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेय.
मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांनी प्रवेश केल्यास त्यांना चपलेने मारण्यात येईल असे पत्रक हाजी अराफत शेख,उपनेता, शिवसेना यांनी प्रसिद्ध केले आहे. ही त्यांची वैयक्तिक भूमिका असून शिवसेने पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. शिवसेनेची भूमिका आहे की मंदीर असो किंवा दर्गा, मशीद महिला पुरूष व  सर्वांनाच  समान अधिकार असावेत. पुरूषांना सर्व  घार्मिक स्थळांमध्ये जे अधिकार आहेत ते सर्व स्रियांनाही असावेत. तसेच न्यायालयाने एकदा निर्णय दिल्यावर त्याची अंमलबजावणी सरकार व पोलिसांनी करायलाच हवी, ही वस्तुस्थिती आहे व सरकारकडून याच पालनाची अपेक्षा आहे. म्हणूनच महिलांच्या धार्मिक स्थळातील प्रवेशास कोणत्याही प्रकारे विरोध करणे योग्य नाही. हाजी अराफत शेख यांची मत हे  पक्षाचे अधिकृत मत नाही याची समज त्यांनाही पक्षाने दिलेली आहे, अशी भूमिका शिवसेना प्रवक्ता नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2016 12:12 pm

Web Title: haji arafat shaikh opinion is not releted to shivsena party says neelam gorhe
Next Stories
1 ‘तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात आल्यास त्यांना चपलेचा प्रसाद देऊ’
2 BLOG : तुम्हाला वाचनाची आवड आहे ?
3 मराठी वाचकांचा भर उपयुक्त पुस्तक खरेदीवर!
Just Now!
X