महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) आज शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. याची जबाबदारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. मात्र, या शॅडो कॅबिनेटमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त जर कोणाला काम करायची इच्छा असेल तर त्यांनी थेट आपल्याला येऊन भेटावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. मनसेचा १४वा वर्धापनदिन सोहळ्यात राज बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, सरकारच्या कामाचे वाभाडे काढण्यासाठी शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सरकारनं जिथं चांगलं काम केलं आहे त्याचं कौतुकही करा असा सल्ला त्यांनी शॅडो कॅबिनेटमध्ये समाविष्ट नेत्यांना दिला आहे. त्याचबरोबर “या प्रतिरूप मंत्रिमंडळाच्याबाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन,” असं आवाहनही यावेळी राज ठाकरे यांनी केलं.

मनसेचं शॅडो कबिनेट असं असणार–

  • गृह, विधी व न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम
  • मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
  • वित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
  • महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
  • ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
  • ग्रामविकास : जयप्रकाश बाविस्कर, अमित ठाकरे
  • मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
  • शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
  • कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
  • नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
  • सहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये
  • अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव
  • मत्स्यविकास : परशुराम उपरकर
  • महिला व बालविकास : शालिनी ठाकरे
  • सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे
  • सार्वजनिक उपक्रम : संजय शिरोडकर
  • सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता
  • सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर
  • कौशल्य विकास : स्नेहल जाधव