23 November 2020

News Flash

लखनभैय्या बनावट चकमक : २१ पोलिसांना जन्मठेप

कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्याच्या बनावट चकमकी प्रकरणी सर्वच्या सर्व म्हणजेच २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

| July 12, 2013 05:21 am

कुख्यात गुंड रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्याच्या बनावट चकमकी प्रकरणी सर्वच्या सर्व म्हणजेच २१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप सूर्यवंशीसह १३ पोलीसांचा समावेश आहे. मात्र, सत्र न्यायालयाने मागच्या शुक्रवारी ‘चकमकफेम’ पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. कोणत्याही चकमकीप्रकरणी एकत्रितपणे पोलीसांना शिक्षा होण्याची मुंबईच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
लखनभैय्या याचे अपहरण करून त्याला ऑगस्ट २००६ मध्ये ठार केल्याचा आरोप ठेवून शर्मा यांच्यासह इतर आरोपी पोलिसांना जानेवारी २०१० मध्ये अटक करण्यात आली. तेव्हापासून हे सर्व पोलीस तुरुंगात आहेत. लखनभैय्या वर्सोव्याला येणार असल्याची टीप मिळाल्यावर पोलिसांनी चकमकीत त्याला ठार केले, असा पोलिसांचा दावा होता. लखनभैय्याचा भाऊ ऍड्‌. रामप्रसाद गुप्ता यांनी हा दावा फेटाळला होता. लखनभैय्याचे एन्काऊंटर होण्यापूर्वी सात तास आधी त्याला पोलिस घेऊन गेले होते, असे त्यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शर्मा व अन्य पाच जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2013 5:21 am

Web Title: lakhan bhaiya encounter 21 convicted sentenced to life imprisonent
Next Stories
1 सत्ताकारणातील दादामंडळींना सहकाराचे दार बंद !
2 मलवाहिन्यांचे पाणी जलवाहिनीत!
3 पावसाच्या तडाख्याने रस्त्यांचे मातेरे
Just Now!
X