22 March 2018

News Flash

आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने होण्याची शक्यता आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला.

मुंबई | Updated: January 3, 2018 5:37 PM

Live updates Maharashtra bandh:

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी बंदला पाठिंबा दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी महाराष्ट्र बंद शांततेच्या मार्गाने पार पडल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादी संघटनांवर हल्ला चढवला. देशातील काही हिंदू संघटनांचा अराजक माजवणे हाच प्रमुख उद्देश आहे. १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथे या संघटनांनी पुन्हा तसाच प्रयत्न केला. मात्र, आजच्या आंदोलनाच्यानिमित्ताने आम्ही त्यांचा खरा अजेंडा जगासमोर आणण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे देशातील काही संघटना गोंधळ माजवण्याचेच काम करतात, हे दिसून आल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

तसेच त्यांनी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची पुन्हा एकदा मागणी केली. सरकार या सर्वांवर लवकरच कारवाई करेल आणि त्यांना अटक करेल, अशी आशा मी करतो. ज्याप्रमाणे याकुब मेमनचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात अप्रत्यक्ष सहभाग असूनही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याच्यावर ३०२ चे कलम लावण्यात आले. तसाच न्याय भीमा कोरेगाव हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना लावला पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

आज सकाळी या बंदची सुरूवात झाली तेव्हा सुरूवातीच्या काही तासांमध्ये मुंबईत आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवत नव्हता. याउलट ठाण्यात सकाळपासूनच आंबेडकरी अनुयायांनी रेल्वे आणि रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. मात्र, पोलिसांनी लगेचच आंदोलकांना रेल्वेच्या ट्रॅक आणि रस्त्यावरून हटवत दोन्ही ठिकाणची वाहतूक सुरळीत केली. तत्पूर्वी औरंगाबादमध्ये सकाळपासूनच एसटी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याशिवाय, येथील इंटरनेटसेवाही बंद करण्यात आली होती.

दुपारी ११ च्या सुमारास मुंबईत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र बंदचे आंदोलन तापायला सुरुवात झाली. घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील आंदोलकांनी रस्त्यावर उतरत पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक रोखून धरली. त्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड आणि पवई येथे आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोड केली. तसेच एलबीएस मार्गावरील आर सिटी मॉलजवळही आंदोलकांनी रस्त्यावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घाटकोपर रेल्वे स्थानक गाठून सर्वप्रथम मध्य रेल्वेच्या ट्रेन्स अडवल्या. आंदोलनाची वाढती धग पाहता मेट्रो प्रशासनाने एअरपोर्ट रोड ते घाटकोपरपर्यंतची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच डोंबिवली स्टेशन आणि कल्याण दरम्यान पत्री पुलाजवळही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रोखण्यात आल्या होत्या. दुसरीकडे, कांजुरमार्ग स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. ५० ते ६० जणांनी स्थानकावरील साईन बोर्ड, पोस्टर, स्टीलच्या खुर्च्या, पाणी प्यायचं मशिन, ट्यूबलाईट्स यांची तोडफोड केली.

ठळक घडामोडी

* आंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे; प्रकाश आंबेडकर यांची घोषणा
* डोंबिवली स्थानकात तिकीट खिडकीची तोडफोड
* आंदोलनांमुळे मुंबईतील मल्टिप्लेक्समधले आणि सिंगल स्क्रिन थिएटरमधल्या चित्रपटांचे शो रद्द
* कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलकांकडून तोडफोड, खुर्च्या, लाइट आणि पिण्याच्या पाण्याचे मशिन फोडले
* मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प. मध्य रेल्वेवर ठाणे, घाटकोपर, विक्रोळी आणि डोंबिवलीत आंदोलन सुरू. पश्चिम रेल्वेवर दादर, एल्फिन्स्ट, गोरेगाव आणि मालाडमध्ये आंदोलन सुरू
* मुंबई विद्यापीठाकडून आजच्या परीक्षा रद्द; १३ विषयांचे पेपर पुढे ढकलले
* दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने

मुंबईच्या सातरस्ता परिसरात शुकशुकाट महाराष्ट्र बंद आंदोलनाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम; मुंबईतील रस्ते ओस पडले.

* डोंबिवली स्थानकात तिकीट घराची तोडफोड
* जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक सुरु
* नागपूर येथे शताब्दी चौक, रिंग रोड येथे युवकांची घोषणा करत रिंग रोड बंद करण्याचा प्रयत्न.


* दादर रेल्वे स्थानकात आंदोलकांची घोषणाबाजी


* गोरेगाव येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखताना आंदोलनकर्ते

* वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आंदोलकांचे ‘रास्ता रोको’

* दादर रेल्वे स्थानकाबाहेरही आंदोलकांची गर्दी. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न

* दादर रेल्वे स्थानकात आंदोलक रेल्वे रुळावर

* एरव्ही गजबजलेला पवईतील या रस्त्यावरही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

* पवई परिसरात बेस्ट बस आणि एका कारची तोडफोड

* पश्चिम रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु

*डोंबिवली स्थानकात आंदोलकांनी एक्स्प्रेस रोखली*चेंबूरमध्ये मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर


*ठाण्यात चेंदणी कोळीवाडा परिसरात रिक्षा आणि टीएमटी बसची तोडफोड, चार प्रवासी किरकोळ जखमी

*इन्फिनिटी मॉल परिसरातही आंदोलकांची गर्दी


*घाटकोपर, असल्फादरम्यान आंदोलकांनी मेट्रो रोखली
* घाटकोपर रेल्वे स्थानकात आंदोलक ट्रॅकवर; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
*महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबई मेट्रोची घाटकोपर ते एअरपोर्ट रोडपर्यंतची वाहतूक बंद
*पवईजवळ अनेक वाहनांच्या काचा फोडल्या
*जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर तोडफोड

*वरळी नाक्यावर आंदोलकांचा रास्तारोको
*नालासोपारा इथे सकाळी दहाच्या सुरामास लोकल वाहतूक अडवण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
*विरार पाठोपाठ गोरेगाव इथे लोकल गाडी अडवत आंदोलन करण्यात आले, मात्र सध्या वाहतूक सुरळीत
*रायगड, खोपोली, माणगाव आणि पेणमध्ये बंद

*पालघरमध्ये कडकडीत बंद
*कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये रिक्षा बंद

*स्वारगेट बस स्थानकात शुकशुकाट, पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ
*भीमा कोरेगाव प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत माहिती देण्याची शक्यता
*दादरमधील फुल बाजारात व्यवहार सुरू
*दादरमध्ये परिस्थिती अगदी सुरळीत, सर्व व्यवहार चोख सुरू, बंदचा कुठलाही परिणाम नाही

*मुंबईतील सेंट झेव्हियर्स कॉलेजची अकरावीची कला, विज्ञान शाखेची आजची परीक्षा रद्द
*मुलुंड चेकनाका परिसरात आंदोलकांनी बेस्ट बसची हवा सोडली, लोकांना बसमधून उतरवलं

* ठाण्यात आंदोलकांना रुळावरून हटवले, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत
* मुंबईत बेस्टची वाहतूक सुरळीत
* ठाणे रेल्वे स्टेशन येथील एसटी आगारामधून मागील १५ मिनिटांपासून बसेसची वाहतूक बंद
* ठाण्यातील निळकंठ टॉवर येथे टीएमटी बसवर दगडफेक; हल्लेखोर बाईकवरून पळाले.
* मध्य रेल्वेमार्गावरील ट्रेन्स २० मिनिटे उशिराने धावत आहेत
* भीमा कोरेगाव हिंसाचारामागे खूप मोठे षडयंत्र- मायावती
* संघ परिवार आणि भाजपाला दलितांनी सन्मानाने जगू नये असे वाटते- मायवती
* दलितांमध्ये भीती, असुरक्षितता निर्माण झाली आहे, ही भावना दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे- मायावती
* ठाण्यात महाराष्ट्र बंद आंदोलनाची जोशात सुरुवात
* मुंबईतील काही खासगी शाळांना सुट्टी जाहीर
* औरंगाबाद, अकोल्यात आज शाळा बंद
* ठाण्यात तीन हात नाक्यावर आंदोलकांनी वाहने अडवल्यामुळे वाहतूक कोंडी
* चेंबूरच्या आरसीएफ परिसरात स्कूल बसेसची तोडफोड
* कल्याण स्थानकात सकाळच्या वेळेत शुकशुकाट
* औरंगाबादमध्ये एसटीची सेवा ठप्प; इंटरनेटसेवाही खंडित

* विरारच्या फलाट क्रमांक ३ वर आंदोलकांनी लोकल ट्रेन रोखली
* मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा बंद राहण्याची शक्यता
* महाराष्ट्र बंदला रिक्षा-टॅक्सी संघटनांचा पाठिंबा, तर कडेकोट बंदोबस्तात एसटी सुरु, तोडफोड न करण्याचे परिवहनमंत्र्यांचे आवाहन
* मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये सुरू; मात्र स्कूल बस बंद
* मुंबईत बेस्टच्या बसेस सुरू
* चेंबूर, वरळी नाका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
* चेंबूर परिसरातील रस्त्यांवर शुकशुकाट; दुकाने बंद

* आंदोलकांनी टीएमटी आणि एसटी बस रोखल्या; ठाणे स्थानकाच्या परिसरात वाहतूक कोंडी
* आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
* ठाण्यात फलाट क्रमांक १ आणि फलाट क्रमांक २ वर आंदोलनाला सुरूवात
* भीमा कोरेगाव हिंसाचार: ठाण्यात आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले
* भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि दलित संघटनांकडू आज महाराष्ट्र बंदची हाक

First Published on January 3, 2018 7:52 am

Web Title: live updates bhima koregaon violence mumbai pune prakash ambedkar dalit outfits on road railway protest
 1. Shivram Vaidya
  Jan 3, 2018 at 8:44 pm
  प्रकाश आंबेडकर काल रिपब्लिक टीव्हीवर अर्नाब गोस्वामीच्या "डिबेट" या कार्यक्रमात रात्री नऊ वाजता भागी झाले होते. अर्नाब गोस्वामीने त्यांना पहिलाच प्रश्न विचारला. तो असा. "उमर खलिद हा माणूस देशाच्या सर्वोच्च संसदेवर अतिरेकी हल्ला करून सुरक्षा रक्षकांचा बळी घेणाऱ्या अफजल गुरुचा समर्थक होता आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये देशद्रोही घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो नेता होता आणि अत्यंत प्रक्षोभक आणि देशद्रोही घोषणा देणाऱ्यांमध्ये तो सक्रीय भागीही होता. या दोन गोष्टींशिवाय त्याच्या नावावर तिसरा कोणताही "पराक्रम" रजिस्टर नाही. मग अशा इसमामध्ये तुम्ही अशी कोणती गोष्ट बघितली की शनिवारवाड्यासमोर झालेल्या "एल्गार" परिषदेमध्ये त्याला तुम्ही प्रमुख वक्ता म्हणून सन्मानाने आमंत्रित केले होतेत?" अर्नाब गोस्वामीच्या या पहिल्याच प्रश्नावर आंबेडकरांची दातखीळ बसली आणि त्या प्रश्नाला उत्तर न देताच ते कार्यक्रम सोडून अक्षरश: पळून गेले ! अशा माणसाकडून देशाप्रति कसल्याही बांधिलकीची, जबाबदारीची, कर्तव्याची अपेक्षा करता येईल का असा माझा सवाल आहे. कोणीही याचे सत्य आणि सुस्पष्ट उत्तर द्यावे.
  Reply
  1. Shivram Vaidya
   Jan 3, 2018 at 8:20 pm
   प्रकाश आंबेडकर, तुमचा जनाधार पूर्णपणे लयाला गेला आहे. खांग्रेसी संस्कृतीमध्ये वाढल्याने तुम्हाला जातीपातीचे विषारी आणि विखारी राजकारण करून तो जनाधार पुन्हा मिळेल असे वाटत असेल तर ती तुमची चुकीची समजूत आहे. वास्तविक सध्या दलीत समाजातील अनेक तरूण समाजातील सर्व घटकांशी गूणवत्ता, हुशारी, क्षमता, बुद्धीमत्ता याबाबतीत यशस्वी स्पर्धा करत आहेत आणि त्यात ते यशस्वीही होतांना दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही हेच अभिप्रेत होते. पण हे सत्य स्वीकारले तर तुमचे राजकीय बस्तान कसे बसणार? समाजात जातीय विद्वेष पसरवून आपली सत्तेची हाव मिटवण्याशिवाय तुम्ही आत्तापर्यंत, दलितांसाठी तरी काय केले आहे? तुमच्यासारखे नेते समाजाच्या एकतेला सुरूंग लावत आहेत. तुमच्यासारख्या नेत्यांविरुद्ध सामाजिक शांतता, सलोखा बिघडवल्यामुळे कडक कायदेशीर कारवाई करून सार्वजनिक संपत्तीच्या नुकसानभरपाईची वसूली तुमच्या खिशामधून वसूल केल्याशिवाय आपल्या देशातील हे प्रकार बंद होणार नाहीत.
   Reply
   1. Nitin Sohani
    Jan 3, 2018 at 5:46 pm
    झालेले नुकसान घ्या प्रकाश आंबेडकर कडून वसूल करून
    Reply
    1. V
     Vaishnavi
     Jan 3, 2018 at 5:01 pm
     What I think is that if you are really followers of Buddha then you should not fight for justice, you should keep calm get justice. No one can do anything wrong with you if you will not do anything wrong with someone. I hope you all are not prejudiced about other casts.
     Reply
     1. R
      Rahul Wankhade
      Jan 3, 2018 at 4:37 pm
      कॉन्स्टिट्यूशन ने प्रत्येकाला आपल्या अधिकारांसाठी आणि जर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडण्यासाठी आंदोलन करण्याची घटनात्मक तरतूद केली आहे पण अशी सार्वजनिक संपत्ती ची तोडफोड करून त्याचा विपर्यास होता कामा नये !!
      Reply
      1. S
       Sunil S. Gaonkar
       Jan 3, 2018 at 4:27 pm
       या बंद (बसेस/एसटी,टॅक्सी, रिक्षा , ची तोडफोड, रेल रोको, रास्ता रोको) मुले झालेले नुकसान कोण भरून देणार ?
       Reply
       1. R
        Raj
        Jan 3, 2018 at 3:27 pm
        Whatever loss has happened, our Income tax will be used to recover this...Who has given anyone right to use our money for these useless people? Who cant construct anything but destructing our things like anything...All the money should be recovered from PRAKASH AMBEDKAR....We want peace here. I guess Dr. Babasaheb Ambedkar wouldnt have teach anyone like this, dont misuse this great name for your purpose.
        Reply
        1. S
         Sameer Deshpande
         Jan 3, 2018 at 2:36 pm
         आंबेडकरी जनता हा शब्दप्रयोग बरोबर वाटत नाही.
         Reply
         1. S
          Sameer Deshpande
          Jan 3, 2018 at 2:21 pm
          आंबेडकरी जनता - हा शब्दप्रयोग बरोबर वाटत नाही.
          Reply
          1. विजय
           Jan 3, 2018 at 1:49 pm
           कुणावरह कुठेही अन्याय झाला तर माझे संवेदनशील मन व्यथित होते. माझे मन तेंव्हा पीडित कोणत्या जाती धर्माचा याचा विचार करत नाही. बंद पुकारून बसेस अन खाजगी वाहनांचे नुकसान करून लाखो लोकांना वेठीस धरून आपली संवेदना व्यक्त करण्याचा मार्ग तेच करतात ज्यांना देशाची घटना आणि कायदा यावर विश्वास नाही. आगीत तेल टाकणारी राजकीय मंडळी तर महाभयानक. भारताला बाहय शत्रूंची आवश्यकता नही. जाती धर्माच्या नावाने ऊठसूठ रस्त्यावर येवून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणारे पुरे आहेत. सर्वसामान्य भारतीय जीव मुठीत धरून राहतो. ब॔दच्या काळात घरात शांत बसतो ते अशा प्रसंगांचे उपद्रव मूल्य टाळण्यासाठी. समर्थन म्हणून कदापी नाही. लोकशाही म्हणून दकाहीही करायचे. ब्रिटिशांच्या काळात तरी असला उद्दाम पणा चालला असता का ?
           Reply
           1. संकेत
            Jan 3, 2018 at 11:21 am
            जखमा खूप खोलवर झाल्या आहेत. भरून निघण्यासाठी वेळ तर लागणार.राग नैसर्गिक पण त्यासाठी हिंसा हा पर्याय ठरू शकत नाही. नेत्यांनी जबाबदार वक्तव्य करावीत हीच प्रार्थना.
            Reply
            1. Y
             YOGESH VASUDEO DIWAN
             Jan 3, 2018 at 10:39 am
             कुणी दगडफेक केली त्याला बाजप कसा जबाबदार असू शकतो. बाजप सत्तेवर आहे याचा अर्थ त्यांना त्यांची प्रतिमा घाण करायची नाही. तरी काही माणसे , पक्ष , जर खापर फोडायचे असा विचार करत असतील तर ते चुकीचे आहे . कुणी काहीही करावे व बाजप ने केले हे सांगावे हे चुकीचे आहे. देशातील संपत्तीचा विनाश करायचा हे कितपत योग्य आहे . एका व्यक्तीसाठी पूर्ण पक्ष किंवा समाज जबाबदार असू शकत नाही. आपण जर असा विचार केला तर कितपत योग्य आहे. माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांना हे आवडला असत का . एकाने वाहयातपणा करायचा आणि बाजप ने केले असे कसे होईल . मुले शाळेत जातात , तिकडे ते अभ्यास केला नाही किंवा उडचोटपणा केला त्याला आईवडील कसे काय जबाबदार राहणार . म्हणून विनंती आहे कि कुठल्याही पक्षाला जबाबदार ठरवू नका. आपणहून विचार करा . आपण जर चिखलात दगड फेकला तर ते चिखल आपल्यावर उडेल . तसेच आपण जर चुकीचे केले तर ते आपल्या वर येईल हे बाजप ला माहित आहे. म्हणून ते तसे करूच शकत नाही म्हणून कुणावर आरोप करू नका वा कुणी करत असेल तर त्याला समजूत द्या . विनंती आहे जय महाराष्ट्र
             Reply
             1. Load More Comments