कर्जत व पळसधरी दरम्यान रेल्वे मार्गावर मालगाडी बिघडल्याने इथली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. लोणावळ्याकडे जाणाऱ्या मालगाडीचे कपलिगं तुटल्याने मालगाडी येथे ट्रॅकवर उभी आहे. मात्र, त्याचा फटका लोकल सेवेला बसला असून मुबंई-खोपोली तसेच मुंबई-पुणे लोकल व एक्सप्रेस सेवा मागील काही तासांपासून ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

एकाच जागी थांबलेली मालगाडी हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु असून लवकरच मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असे सुत्रांकडून कळते. दरम्यान, मुंबई आणि पुणे दोन्ही दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप करावा लागला आहे. खोळंब्यामुळे त्यांच्या पुढील नियोजित कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.