मुंबईतील कुर्ला स्थानकाजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याणकडे जाणारी जलद मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. कुर्ला ते सायन दरम्यान रुळांवर पाणी साठलं आहे त्यामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.ठाणे स्थानकातही पाणी साठल्याने सीएसएमटीला येणारी आणि कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

मानखुर्द स्टेशनजवळ पुलाचा स्लॅब पडल्याची माहितीही मिळते आहे. स्लॅब ओव्हरहेड वायरवर पडल्याने हार्बर मार्ग ठप्प झाला आहे.

शुक्रवार रात्रीपासूनच मुंबईत पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे आज सकाळपासून तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा विस्कळीत झाली होती. १० ते १५ मिनिटे  आता हार्बर आणि मध्य मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरची वाहतूक रखडली. कल्याणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकल्स ठाण्यापर्यंत येऊन रद्द करण्यात येत आहेत. तर मुंबईहून कल्याणच्या दिशेने निघालेल्या लोकल या मुलुंडला रद्द करण्यात येत आहेत. त्यामुळे घरी जाताना चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. मुलुंडपर्यंत डाऊन लोकल्सच्या रांगा लागल्या आहेत.