News Flash

तरुण तेजांकित होण्याची तुम्हालाही संधी..

‘लोकसत्ता’च्या उपक्रमाला तरुणाईची दमदार साथ

नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस; ‘लोकसत्ता’च्या उपक्रमाला तरुणाईची दमदार साथ

कर्तृत्वाच्या क्षितिजावर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ किताब मिळाला आणि ते कर्तृत्वाच्या अवकाशात पूर्ण तेजाने चमकू लागले. गेल्या वर्षी ‘तेजांकित’ ठरलेल्या अशा १२ कर्तृत्ववंतांच्या कार्याची महती ‘लोकसत्ता’मुळे दूरदेशीही पोहोचली. तेजांकितांच्या मनात त्याबद्दल कृतज्ञता आहे. पण यंदा तेजांकित ठरण्याची संधी तुम्हालाही आहे. ती दवडू नका, नोंदणीसाठी रविवारी शेवटचा दिवस आहे.

तुम्ही प्रवाहाविरुद्ध पोहून ठोस काही करत असाल, जिद्दीने संशोधनात मग्न  असाल, नि:स्वार्थी भावनेने समाजसेवेला वाहून घेतले असेल, चित्रपटासह अन्य ललितकलांमध्ये मळलेली वाट सोडून नवी वाट धरली असाल तर ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा तुमचा, तुमच्यासाठीचा उपक्रम आहे. गतवर्षी विविध क्षेत्रांतील १२ तेजांकितांच्या कार्याला या उपक्रमाने आणखी झळाळी मिळाली. यंदा निवडल्या जाणाऱ्या तेजांकितांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या उपक्रमासाठी आत्तापर्यंत राज्यभरातील तरुणाईने दमदार प्रतिसाद  दिला असून आग्रहास्तव वाढवून देण्यात आलेली नोंदणीची मुदत रविवारी संपत आहे. ऑनलाइन नोंदणी करून या उपक्रमात केवळ आजच्या दिवशीच सहभागी होता येणार आहे.

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण मोठय़ा जिद्दीने पाय रोवून उभे आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. तेव्हा कला, क्रीडा, आरोग्य, समाजसेवा, संशोधन अशा कोणत्याही क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या गुणवंतांनी ‘लोकसत्ता’च्या उपक्रमासाठी आजच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरणे आवश्यक आहे.

विभागनिहाय समित्या

  • पुणे : श्रीरंग इनामदार (क्रीडा), योगेश शौचे (संशोधन), प्रसाद वनारसे (कला), अरविंद पाटकर (साहित्य), विनोद शिरसाठ (सामाजिक/साहित्य)
  • नागपूर : डॉ. सुखदेव थोरात (सामाजिक), डॉ. प्रमोद पडोळे (संशोधन), अ‍ॅड्. स्मिता सिंगलकर (कला), नितीन लोणकर (नवउद्यमी), डॉ. शरद सूर्यवंशी (क्रीडा)
  • नाशिक : अपूर्वा जाखडी (विज्ञान/संशोधन), मकरंद हिंगणे (संगीत), अभय कुलकर्णी (नवउद्यमी), आनंद खरे (क्रीडा), डॉ. वृंदा भार्गवे (कला/साहित्य), मेधा सायखेडकर (विधि), संदीप डोळस (समाजकारण)
  • औरंगाबाद : मुकुंद कुलकर्णी (उद्योग), विश्वनाथ ओक (संगीत), बी. बी. ठोंबरे, सु. भि. वराडे (कृषी)
  • कोल्हापूर : दिलीप बापट (कला), अनंत माने (उद्योग), प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर (विज्ञान)
  • रत्नागिरी : डॉ. पराग हळदणकर (संशोधन), डॉ. किशोर सुखटणकर (शिक्षण/संशोधन), नितीन कानविंदे (कला), उदय लोध (व्यापार/पर्यटन), मिलिंद दीक्षित (क्रीडा)

नोंदणी कशी कराल?

उपक्रमात सहभागी होण्यासाठी ४० वर्षांखालील प्रज्ञावंतांनी http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरून आज रात्रीपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. संकेतस्थळावर नोंदणी करताना काही अडचणी आल्यास taruntejankit@gmail.com या ई-मेलवर किंवा भ्रमणध्वनी क्र. ९३७२२२३९६३ यावर सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत संपर्क करता येईल. राज्यभरातून आलेल्या अर्जामधून मान्यवरांची समिती यंदाचे ‘तरुण तेजांकित’ निवडणार आहे. त्यासाठी विभागीय समित्या नेमण्यात आल्या आहेत.

प्रायोजक..  : केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमाचे सारस्वत बँक सहप्रायोजक असून एम. के. घारे ज्वेलर्स ‘पॉवर्ड बाय’ पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:17 am

Web Title: loksatta tarun tejankit 2019 3
Next Stories
1 धावपट्टय़ांच्या डागडुजीमुळे विमानसेवा विलंबाने
2 पवारांची काँग्रेसपुढे शरणागती!
3 राज ठाकरे राष्ट्रवादीसोबत येणार का? विचारताच शरद पवार म्हणतात…
Just Now!
X