22 April 2019

News Flash

मेधा गाडगीळ यांची वित्तीय महामंडळात बदली

मेधा गाडगीळ यांची बदली करून वित्तीय महामंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदाच्या शर्यतीत असलेल्या अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची सोमवारी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्याच्या आधी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोमवारी आणखी तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

महसूल विभागाच्या (मदत व पुनर्वसन) अप्पर मुख्य सचिव मेधा गाडगीळ यांची बदली करून वित्तीय महामंडळाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील निधी पांडे यांची पाचव्या राज्य वित्तीय महामंडळाच्या सदस्य सचिवपदी बदली करण्यात आली. तर जळगाव जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी के. के. निंबाळकर यांची मंत्रालयात मदत व पुनर्वसन विभागाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

First Published on February 12, 2019 4:41 am

Web Title: medha gadgil transferred to maharashtra state financial corporation