या रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी कामांमुळे मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेमार्गावर ओव्हरहेड यंत्रणा आणि सिग्नल दुरूस्ती-देखभालीसाठी जम्बोब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
मध्य रेल्वे
कुठे? माटुंगा-मुलुंड डाऊन धीमा मार्ग
’कधी? सकाळी ११ ते दु. ३.२३
’परिणाम? कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाडय़ा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप या स्थानकांवर थांबतील. मुलुंडपासून पुन्हा त्या धीम्या मार्गावर जातील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर येथील प्रवाशांना अप मार्गाने आपले स्थानक गाठता येईल. डाऊन आणि अप दिशेच्या सर्व जलद गाडय़ाही घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील
हार्बर रेल्वे
कुठे? नेरूळ आणि मानखुर्द अप आणि डाऊन मार्ग
’कधी? सकाळी ११ ते दु. ३
’परिणाम? सकाळी १०.१२ पासून दुपारी ४ पर्यंत सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीसाठी सुटणाऱ्या तसेच तेथून सीएसटीकडे येणाऱ्या गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे बंद. सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेल भागात खास गाडय़ा सोडण्यात येतील. या काळात हार्बर प्रवाशांना मेन आणि ट्रान्सहार्बर रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वे
कुठे? सांताक्रुझ आणि गोरेगाव जलद मार्ग
’कधी? सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
’परिणाम? सांताक्रुझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही दिशेकडच्या गाडय़ा धीम्या मार्गावरून जातील. यामुळे काही गाडय़ा रद्द होणार असून त्याची माहिती सर्व स्थानकांवरील स्टेशनमास्तरकडे उपलब्ध असेल.