News Flash

मनसेचा उद्यापासून फेरीवाल्यांविरोधात ‘एल्गार’!

मनसेचे मुंबईकरांचा संताप मोर्चा पाच ऑक्टोबर रोजी मेट्रो ते चर्चगेट असा काढला होता.

संग्रहित छायाचित्र

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे काढलेल्या ‘संताप मोर्चा’त रेल्वे पूल तसेच रेल्वेमार्गालगतच्या फेरीवाल्यांना हटविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत उद्या संपत असून त्यानंतर या फेरीवाल्यांना आता मनसेच्या ‘कारवाई’ला सामोरे जावे लागणार आहे. मनसेचा फेरीवाल्यांविरोधातील ‘एल्गार’ उद्यापासून दिसेल असे मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सांगितले.

मनसेचे मुंबईकरांचा संताप मोर्चा पाच ऑक्टोबर रोजी मेट्रो ते चर्चगेट असा काढला होता. राज ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले होते. चर्चगेट रेल्व