व्होल्वो कंपनीकडून सादरीकरण; एसटी महामंडळाकडमून विचार

प्रवासी क्षमता वाढवितानाच एसटीचा चालनीय खर्च कमी व्हावा, या उद्देशाने एसटी महामंडळाने ताफ्यात डबल डेकर बस आणण्याचा निर्णय गेल्या आठ वर्षांत अनेक वेळा घेतला. यासाठी मुंबई ते पुणे यासारख्या व्यस्त मार्गावर डबल डेकर बसची चाचणीदेखील घेण्याचा विचार केला गेला. मात्र या मार्गावर डबल डेकल बस चालविताना असणारे तांत्रिक अडथळे  पाहता ही बस चालविणे कठीण असल्याचे मत महामंडळाच्या संबंधित विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणानंतर व्यक्त करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा डबल डेकर बस चालविण्यासाठी एसटी महामंडळाकडून सकारात्मक विचार केला जात आहे.

व्होल्वो कंपनीने दिल्लीत डबल डेकर बसचे सादरीकरण केल्यानंतर या संदर्भात एसटीकडून कंपनीशी चर्चाही करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाकडे सध्याच्या घडीला १८ हजार बस आहेत.  प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाकडून नवीन वातानुकूलित बस दाखल करण्याचे धोरणही आखण्यात आले आहे. आता डबल डेकर बसचे पुन्हा एकदा स्वप्न बाळगले आहे.  गर्दीचा असो वा कमी गर्दीचा हंगाम एसटी महामंडळाला एकाच मार्गावर अनेक बसेस सोडाव्या लागतात. त्यामुळे खर्च बराच वाढतो.  खर्च आणि जास्त प्रवाशांची वाहतूक व्हावी या उद्देशाने डबल डेकर बस चालविण्याचा पर्याय महामंडळाकडून शोधण्यात येत

आहे.   काही दिवसांपूर्वीच दिल्लीत देशभरातील राज्य परिवहन सेवांच्या असलेल्या एएसआरटीयूच्या (असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) बैठकीत व्होल्वो बस कंपनीने डबल डेकर बसचे सादरीकरण केले. यात व्होल्वोने भारतातच डबल डेकर बस बांधणीची तयारी असल्याचे सांगितले.

दिल्लीत एएसआरटीयूच्या बैठकीत व्होल्वो बस कंपनीने डबल डेकर बसचे सादरीकरण केले आणि या बस भारतातच बनविण्याची तयारी असल्याचे सांगितले. भारतातील रस्त्यांची रचना पाहिल्यास त्यानुसार बसची बांधणी होत असेल तर या बस आम्ही नक्की चालवू.

– रणजित सिंह देओल (एसटी महामंडळ, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)