मुंबईमध्ये करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४१ टक्क्य़ांवर पोहोचले असले तरी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील एक हजार १५० जणांना करोनाची लागण झाली असून एकूण बाधितांची संख्या  ४५ हजार ८५४ वर पोहोचली आहे. शुक्रवारी ५३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असून करोना बळींची संख्या एक हजार ५१८ झाली आहे.

शुक्रवारी एक हजार १५० जणांना करोना झाल्याचे चाचणी अहवालावरुन स्पष्ट झाले. त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिणामी, मुंबईतील करोनाबाधितांची संख्या ४५ हजार ८५४ झाली आहे.

शुक्रवारी मृत्यू झालेल्या ५३ रुग्णांपैकी ४७ जणांना दीर्घकालीन आजार होते. आतापर्यंत एक हजार ५१८ करोनाबाधितांची मृत्यू झाला आहे. मात्र एकूण रुग्ण संख्या लक्षात घेता मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के इतके आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये शुक्रवारी ७५८ संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले. तर विविध रुग्णालयात दाखल ६९९ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले. बरे होऊन रुग्णालयातून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या १८ हजार ७९७ झाली आहे. उपचाराअंती बरे होणाऱ्या करोनाबाधितांचे प्रमाण ४१ टक्के आहे.

मुंबईमध्ये ४ जूनपर्यंत दोन लाख १५ हजार ८२९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

पालिकेच्या पी-उत्तर, आर-मध्य, आर-उत्तर, आर-दक्षिण, एस आणि टी या विभाग कार्यालयांच्या हद्दीत करोना वाढीचे प्रमाण ५ टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे, तर २८ मे ते ३ जून या काळात मुंबईतील करोना वाढीचे  प्रमाण ३.६ टक्के इतके होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai number of patients is over 45000 abn
First published on: 06-06-2020 at 00:59 IST