24 November 2020

News Flash

मुंबईत सेक्स रॅकेट उद्ध्वस्त

सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत

सिनेसृष्टीशी संबंधित दलाल तरुणी अटकेत

मुंबई : पश्चिम उपनगरांतील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त के ले. या कारवाईत अटक करण्यात आलेली दलाल तरुणी सिनेसृष्टीशी संबंधित आहे. ती हिंदी, पंजाबी चित्रपट-मालिका क्षेत्रांतील तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलत असल्याचे उघडकीस आल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आल्याचा दावा गुन्हे शाखेने के ला.

अटक आरोपी २७ वर्षांची असून तिने हिंदी चित्रपटात अभिनय के ल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी तरुणी हिंदी, पंजाबी मालिका, तसेच चित्रपटांत अभिनय, नृत्य करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ओढते. शहरातील पंचतारांकित हॉटेलांमध्ये मागणीप्रमाणे तरुणींचा पुरवठा करते, अशी माहिती दहिसर कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तावडे यांना मिळाली होती.

या माहितीची खातरजमा करून गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये शुक्र वारी छापा घालण्यात आला. तेथे आरोपी तरुणीसह अन्य तीन तरुणी आढळल्या. या तीन तरुणींनी चित्रपटांमध्ये काम के ले आहे. या तिघींसाठी आरोपी तरुणी १० लाखांहून अधिक रक्कम आकारणार होती, असे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 12:17 am

Web Title: mumbai police bust high profile sex racket at 5 star hotel zws 70
Next Stories
1 मुंबई महापालिकेचं पथक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर
2 …या बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे – संजय राऊत
3 मुंबईकरानो, मास्क घालूनच घराबाहेर पडा, नाहीतर करावी लागेल रस्त्यावर साफसफाई
Just Now!
X