विविध दुरुस्तीकामांसाठी रविवारी पश्चिम, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे रविवारी गणेशोत्सवानिमित्त खरेदीसाठी बाहरे पडणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बरवर कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप आणि डाऊन मंदगती मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

  • कुठे : कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग
  • कधी : रविवार, ९ सप्टेंबर, स. ११.१५ ते दु.४.१५
  • परिणाम : कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या जलद लोकल गाडय़ा कल्याण ते ठाणे दरम्यान अप मंदगती मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यानंतर ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान त्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकात या लोकल थांबतील. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने, तर मेल-एक्सप्रेस गाडय़ा २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर मार्ग

  • कुठे : कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्ग
  • कधी : रविवार, ९ सप्टेंबर. स. ११.१० ते दु.४.१०
  • परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गाडय़ा रद्द करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे

  • कुठे : चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल अप आणि डाऊन मंदगती मार्ग
  • कधी : रविवार, ९ सप्टेंबर. स. १०.३५ ते दु. ३.३५.
  • परिणाम : ब्लॉकवेळी चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रर दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात येतील. काही लोकल फेऱ्ऱ्या रद्द करण्यात येतील.