सीएसएमटीहून शेवटची लोकल मध्यरात्री १२.२५ ची; अनेक लोकल फे ऱ्या रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते मशिद बंदर स्थानकादरम्यान ८ सप्टेंबर रोजी सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी मध्यरात्रीपासून विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा, सीएसएमटी ते मशिद आणि सीएसएमटी ते वडाळा दरम्यान दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीहून शेवटची लोकल मध्यरात्री १२.२५ वाजताची कर्जतसाठी सोडण्यात येईल. त्यानंतर सीएसएमटीहून सुटणाऱ्या ठाणे व कुर्ला लोकल मात्र धावणार नाहीत.

सीएसएमटी ते भायखळादरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर मध्यरात्री १२.३५ ते सकाळी ६.०५, तर सीएसएमटी ते मशिद बंदर दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर तसेच हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर मध्यरात्री २.३५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटीसाठी अप धिम्या मार्गावरून जाणारी रात्री १२.१०ची आसनगाव-सीएसएमटी ३२ ही लोकल तर डाउन धिम्या मार्गावर सीएसएमटीहून कर्जतसाठी रात्री १२.२५ वाजताची शेवटची लोकल असणार आहे. अप धिम्या मार्गावरील भायखळा स्थानकातून रात्री १२.३६ ते १.१० आणि पहाटे ४.३७ ते सकाळी ६.०६ या वेळेतील लोकल भायखळा ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावरुन चालविण्यात येईल. तर सीएसएमटी स्थानकातुन पहाटे ४.४८ ते सकाळी ६.०२ या वेळेत डाउन धिम्या मार्गावरुन धावणाऱ्या लोकल सीएसएमटी ते भायखळा दरम्यान डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येतील. त्यामुळे या लोकल मशिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकात थांबणार नाहीत. परिणामी या स्थानकातील लोकल ब्लॉक काळात हार्बर मार्गावरुन प्रवास करू शकतात.

८ व ९ सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आलेल्या लोकल

  • सीएसएमटी ते ठाणे-मध्यरात्री १२.२८ वा
  • सीएसएमटी ते कुर्ला- मध्यरात्री १२.३१ वा
  • सीएसएमटी ते अंबरनाथ-पहाटे ५.४० वा
  • ठाणे ते सीएसएमटी- पहाटे ४.४० वा
  • अंबरनाथ ते सीएसएमटी- पहाटे ४.११ वा
  • कल्याण ते सीएसएमटी- पहाटे ४.४१ वा
  • कुर्ला ते सीएसएमटी- पहाटे ५.५४ वा
  • कल्याण ते सीएसएमटी- पहाटे ६.१५ वाजता

याशिवाय बदलापूर ते सीएसएमटी रा.९.५८ ची लोकल ठाणे,कर्जत ते सीएसएमटी रा.९.४३ ची लोकल कुर्ला स्थानकापयर्ंतच चालविण्यात येणार आहे.  तर डाउन मार्गावरील सीएसएमटी ते कसारा पहाटे ४.१५ ची लोकल ठाणे स्थानकातून पहाटे ५.१० वा,सीएसएमटी ते खोपोली पहाटे ४.२४ ची लोकल दादर स्थानकातून पहाटे ४.४२ वाजता आणि सीएसएमटी ते टिटवाळा स.५.५२ ची लोकल कल्याण स्थानकातून स ७.२३ वाजता सोडण्यात येणार आहे.