मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री दुरुस्ती कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदरदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक बंद असेल. पश्चिम रेल्वेची वाहतूक रविवारी वेळापत्रकानुसार सुरू असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग आणि हार्बरवर रविवार, ३० डिसेंबरला मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप मंदगती मार्गावर आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहील.

पश्चिम रेल्वे

  • कधी – शनिवार, २९ डिसेंबर मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४ वा.
  • कुठे – वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्ग
  • परिणाम- ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेवरील काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील, तर काही उशिराने धावतील.

 

हार्बर मार्ग

  • कधी- रविवार, ३० डिसेंबर, स. ११.१० ते दु. ३.४० वा.
  • कुठे- कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन
  • परिणाम- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानच्या दोन्ही मार्गिकांवरील लोकल फेऱ्या रद्द. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलदरम्यान विशेष लोकल सोडण्यात येतील.

 

मध्य रेल्वे -मुख्य मार्ग

  • कधी- रविवार, ३० डिसेंबर, सकाळी ११.१० ते दु. ३.४०
  • कुठे- मुलुंड ते माटुंगा अप मंदगती मार्ग
  • परिणाम- ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या मंदगती मार्गावरील लोकल मुलुंड ते माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर धावतील. त्यांना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, शीव स्थानकात थांबा देण्यात येईल. अप आणि डाऊन मंदगती मार्गावरील लोकल गाडय़ा दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावतील.