मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या बुधवारी आणखी कमी झाली असून ६७३ नव्या रुग्णांची नोंद झाली. दैनंदिन मृतांची संख्याही कमी झाली असून ७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मंगळवारी २६ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण अडीच टक्के आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या ७ लाख १३ हजारांपुढे गेली आहे. करोना मृतांची एकू ण संख्या १५ हजार ७३ झाली आहे. एका दिवसात ७५१ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८० हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १५ हजार ७०१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मंगळवारी २६ हजार ९९२ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी अडीच टक्के नागरिक बाधित आढळले. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५४३ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात ३९४ करोना रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी ३९४ करोना रुग्ण आढळून आले. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. दररोजच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यांतील रुग्णसंख्येची ही सर्वाधिक घट आहे.

जिल्ह्य़ात आढळून आलेल्या ३९४ करोना रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवलीत १०२, ठाणे ९५, मिरा भाईंदर ५८, ठाणे ग्रामीण ४९, नवी मुंबई ४७, अंबरनाथ १६, भिवंडी ११, बदलापूर नऊ  आणि उल्हासनगरमध्ये सात रुग्ण आढळून आले. तर कल्याण डोंबिवलीत १८, ठाणे ग्रामीण आठ, नवी मुंबई चार, मिरा भाईंदर दोन, ठाणे दोन, उल्हासनगर एक आणि भिवंडीतील एकाचा मृत्यू झाला.