लोकसभा निवडणुकीतील यशानंतर पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून त्यावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना गर्भीत धमकी दिली आहे. पाकिस्तानचे तुम्ही काहीच बिघडवू शकत नाही, असे हॅकर्सनी पाठविलेल्या संदेशात मोदी यांना उद्देशून म्हटले होते.
मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अचानक एक संदेश दिसू लागला. हा संदेश पाठविणाऱ्याचे नाव ‘ब्लेझिंग हॅकर्स पाकिस्तान’ असे नमूद करण्यात आले होते. मोदीजी तुम्ही सहा महिन्यामध्ये पाकिस्तानचे नामोनिशाण मिटविणार आहात. पाकिस्तानमध्ये गुप्त मोहीम राबविणार आहात, असे ऐकले आहे. पण मोदीजी प्रथम तुम्ही स्वत:ला सुरक्षित करा, असा इशारा या संदेशात दिला होता.
तुम्ही ठरवूनही पाकिस्तानचे काहीच बिघडवू शकणार नाही. कारण ‘बाप’ हा ‘बाप’च असतो, असे संदेशात म्हटले होते. मात्र ही बाब लक्षात येताच काही तासातच हा संदेश मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन काढून टाकण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2014 रोजी प्रकाशित
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर पाकिस्तानी हॅकर्सनी मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून त्यावर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना गर्भीत धमकी दिली आहे.

First published on: 19-05-2014 at 06:22 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university website hacked