News Flash

…तर मुंबईकर १ जूनपर्यंत करोनापासून होऊ शकतात सुरक्षित; अभ्यासातील दिलासादायक निष्कर्ष

लोकल सुरू झाल्यानंतर करोनाच्या नवीन विषाणूचा अधिक प्रसार

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

मुंबईमधील करोना रुग्णांच्या दुपटीच्या कालावधी हा सरासरी शंभर दिवसांवर पोहोचला आहे, तर करोना वाढीचा दर ०.६६ टक्क्यांवर घसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या कमी झालेली असली, तरी मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ३,६७२ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर करोनामुळे ७९ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेत अभ्यासानुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविड मृत्यूंची संख्या वाढणार असल्याचे सागंण्यात आले आहे. मात्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार, जर शहरात ७५ टक्क्यांपर्यंत लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोविड मृत्यू दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबईमध्ये महिन्याभरात २० लाख नागरिकांचे लसीकरण होणं गरजेचं आहे, तरच जून महिन्यापर्यंत मृत्यूदर कमी होण्याची शक्यता आहे. १ जुलै किंवा त्यानंतर लवकरच शाळासुद्धा सुरु करता येऊ शकतात, असे टीव्हीएफआरचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितलं. मात्र हे पूर्वानुमान असल्यानं यामध्ये चूक होण्याची देखील शक्यता आहे. जुलै महिन्याच्या जवळपास या सर्वांचे मूल्यांकन करता येईल, असंही जुनेजा म्हणाले.

करोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार हा दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. लोकल सुरू झाल्यानंतर त्याचा अधिक प्रसार सुरू झाला. फेब्रुवारीमध्ये मुंबई व महाराष्ट्रातील अन्य मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा नवीन विषाणू वेगाने पसरत गेला. जसजशी रस्त्यांवर लोकांची आणि गाड्यांची गर्दी वाढत गेली, तसतसा कोविडच्या विषाणूचा प्रसार होत गेला आणि त्यामुळे दुसरी लाट आली, असं टीआयएफआरनं म्हटले आहे. पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर अशा इतर जिल्ह्यांतील दुसरी लाट ही मुंबईमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीसारखीच असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू

मुंबई पालिकेच्या नायर, वांद्रे-कुर्ला संकुलातील(बीकेसी) करोना केंद्र, कूपर, सेव्हनहिल्स आणि राजावाडी या पाच केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात आले आहे.नोंदणी करून टाईम स्लॉट दिल्यानंतर हे लसीकरण करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 12:56 pm

Web Title: mumbaikars can be safe from corona till june 1tvfr reassuring findings from the study abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 आयपीएल संघात स्थान मिळवूण देतो सांगत, ३० लाखांची फसवणूक
2 राज्याच्या आर्थिक विकासाचा ऊहापोह…
3 मोफत लसीकरणाची विरोधकांची मागणी
Just Now!
X