राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणारा घोडबंदर मार्गावरील क्रीडा संकुलाचा शुभारंभ सोहळा रद्द होताच गुरुवारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी आपल्या तलवारी म्यान करत थेट शिवसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख एकनाथ िशदे यांचे घर गाठले आणि पवारांचा कार्यक्रम ठरल्यानुसार व्हावा यासाठी त्यांच्याकडे मिनतवाऱ्या केल्या.
विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना मानणारा नगरसेवकांचा एक मोठा गट शिंदे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटल्यावर सायंकाळी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी मवाळ भूमिका घेत कार्यक्रम ठरल्यानुसार आणि पवारांच्या उपस्थितीतच होईल, असे जाहीर केले. ‘पवारांना आमचा विरोध नव्हता, मात्र खासदार संजीव नाईक यांचे श्रेयाचे राजकारण हाणून पाडण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम रद्द केला होता’, अशी कबुली या वेळी शिवसेना आमदार राजन विचारे यांनी दिल्याने ज्येष्ठ धावपटू मिल्खासिंह यांच्या नावाचा या राजकारणात वापर केला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे येथील घोडबंदर मार्गावर ढोकाळी परिसरात राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांच्या प्रभागात महापालिकेने सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून हे क्रीडा संकुल उभारले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
पवारांच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या मिनतवाऱ्या
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणारा घोडबंदर मार्गावरील क्रीडा संकुलाचा शुभारंभ सोहळा रद्द होताच गुरुवारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका

First published on: 08-02-2014 at 03:04 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader meet shiv sena for sharad pawar programme of indoor stadium inauguration