राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताना मिळत आहेत. केंद्राकडून योग्य ती मदत मिळत नसल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. अशात भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला आहे.

मुंबई ठाण्यात अडकलेल्या हजारो मजुरांना मध्यप्रदेश सीमेपर्यंत सोडणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडल्याची टीका निरंजन डावखरे यांनी केली आहे. एवढंच नाही तर मुंबई आणि ठाणे विभागात कार्यरत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप मे महिन्याचा पगारही मिळाला नाही असाही आरोप त्यांनी केला आहे.