भारतीय इतिहासाची अचूक जाण असणारे आणि त्याची जपणूक करणारे लेखक, कला समीक्षक, संग्रहालयक तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम (आताचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) या ठिकाणी त्यांनी सहाय्यक अभिरक्षक म्हणून त्यांनी १९६४ मध्ये त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. संग्रहालयशास्त्रात त्यांनी डॉक्टरेटही त्यांनी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच कोकणातील देवरुख येथील लक्ष्मीबाई पित्रे संग्रहालय साकारले गेले. तिथे इंग्रजांच्या काळातील बॉम्बे स्कूल ऑफ आर्टच्या शैलीतील चित्रकलेचे अत्यंत दुर्मिळ नमुने संरक्षित करण्यात आले आहेत.

राजभवन्स इन महाराष्ट्र, अॅनिमल्स इन इंडियन आर्ट, द मॅरिटाइम हेरिजेट ऑफ इंडिया, कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया ही त्यांनी लिहिलेली पुस्तकं आहेत. उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे त्यांनी महाराष्ट्राचा प्रवासही डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातून उलगडला आहे.