मुंबई ते पुणे मार्गावर १० ते १५ टक्के च प्रतिसाद

मुंबई : एसटीचा राज्यांतर्गत प्रवास सुरू झाल्यानंतर सर्वाधिक मागणी असलेल्या मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावरील वातानुकू लित शिवनेरी सेवा पूर्ववत झाली असली तरी करोनाच्या धास्तीने दोन्ही शहरांतील नागरिकांनी प्रवास टाळणेच पसंत के ले आहे. गेल्या २० दिवसांत या सेवेला के वळ १० ते १५ टक्के च प्रतिसाद आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात शिवनेरीच्या भाडेदरात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्यात आली. त्यामुळे शिवनेरीचा प्रवास स्वस्त झाला. भाडे कपातीमुळे २०१८च्या तुलनेत २०१९मध्ये शिवनेरीच्या दररोजच्या प्रवासीसंख्येत वाढ झाली. ही संख्या २१ हजारांपर्यंत पोहोचली. २०२०च्या फे ब्रुवारीपर्यंत ही वाढ कायम राहिली. तर बसगाडय़ांची संख्याही वाढून ३०० फे ऱ्या होऊ लागल्या. टाळेबंदीत बंद असलेला हा २० ऑगस्टपासून सुरू झाला आणि मुंबई, ठाणे ते पुणे मार्गावर शिवनेरीसह निमआरामही गाडय़ा धावू लागल्या. परंतु निमआराम गाडय़ांचे प्रमाण कमी आहे. सध्या ४४ ऐवजी २२ प्रवासी घेऊनच जाण्याची मुभा असल्याने शिवनेरीला मुंबई,

ठाण्यातून जाताना व पुण्यातून परतीच्या प्रवासातही बहुतांश वेळा कमीच प्रवासी मिळतात. २० ऑगस्टला १०० प्रवाशांनी शिवनेरीतून प्रवास के ला होता.

हीच संख्या प्रतिदिन के वळ एक हजार ते दीड हजारापर्यंत पोहोचली आहे.

सध्या शिवनेरीच्या मुंबई ते पुणे रेल्वे स्थानक अशा दररोज ३१ फे ऱ्या होतात. तर ठाणे ते पुणे मार्गावर १४ फे ऱ्या होत असल्याची माहिती दिली. तर पुण्यातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या गाडय़ांनाही १० ते १५ टक्के   प्रतिसाद मिळत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सध्याच्या घडीला या दोन्ही शहरांत करोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे प्रवाशांचा  प्रतिसाद कमीच आहे.

एका आसनावर एकच प्रवासी

मुंबई ते पुणे मार्गावरील शिवनेरी, निमआराम एसटीला प्रतिसाद वाढवण्यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न के ले जाणार आहेत. खासगी वाहनाने जाण्यापेक्षाही एसटीचा प्रवासही सुरक्षित आहे हे पटवून देण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न के ले जातील. त्यासाठी एका आसनावर एकच प्रवासी, दररोज सॅनिटाईज होणारी बस, साफसफाई याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे.