वीज नियामक आयोगामार्फत राज्यातील विजेचे दर ठरवले जाऊ लागल्यापासून गेल्या दहा वर्षांत सातत्याने पाच ते १६ टक्क्यांपर्यंत दरवाढ होत राहिली. तथापि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेनुसार दरवाढ कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करून ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे २०१५-१६ साठी विजेचे दर ५.७२ टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत सांगितले.
राज्य शासनाने केलेल्या अनेक उपाययोजनांमुळे विजेचे दर कमी करता येणे शक्य झाले असून याचा फायदा यंत्रमागधारक, सर्व शासकीय शाळा, दवाखाने, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, शासकीय ग्रंथालये, महापालिका, नगरपालिकांपासून ग्रामपंचायत कार्यालयांपर्यंत साऱ्यांना होणार
आहे.
या सर्वाना यापूर्वी पन्नास किलोव्ॉटसाठी १०.२८ रुपये प्रति युनिट होते ते कमी होऊन ७.२० रुपये झाले आहेत. अशासकीय सार्वजनिक सेवा ग्राहकांसाठीही वीज दर पन्नास किलोव्ॉटपेक्षा जास्त वापरासाठी १०.२८ रुपयांवरून ७.६८ रुपये झाले आहेत. मेट्रो व मोनोरेलसाठी नवीन वर्गवारी करण्यात आली असून हा दर ८.४६ रुपये प्रति युनिट करण्यात आला आहे.

उल्हासनगर रुग्णालयाची तातडीने दुरुस्ती
ठाणे जिल्ह्य़ातील उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाच्या दुरुस्ती व देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने करण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिले.