News Flash

Happy Birthday Sachin : मुंबईकर अवलिया फॅनच्या सचिनला हटके शुभेच्छा!

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मुंबईतील त्याच्या चाहत्यानं अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत!

फक्त भारतच नाही तर अवघ्या क्रिकेट विश्वाचा लाडका सचिन तेंडुलकर याचा आज ४८वा वाढदिवस! सचिनच्या लाखो-करोडो चाहत्यांसाठी आजचा दिवस म्हणजे त्यांच्या स्वत:च्या वाढदिवसापेक्षाही स्पेशल! जगभरातून सचिनचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत असतात. पण मुंबईच्या परळ येथे राहाणाऱ्या अभिषेक साटमनं आपल्याच हटके स्टाईलमध्ये आपल्या लाडक्या सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यानं वापरल्या आहेत ६ रंगांच्या तब्बल ३० हजार १२ कागदी टिकल्या! आपल्या कलाकृतीतून त्यानं २०११ च्या विश्वचषक विजयादरम्यानच्या सचिनच्या आठवणी जाग्या केल्या आहेत! नेमकं केलंय काय या पठ्ठ्यानं?

अभिषेककडे सचिनवर लिहिलेल्या वेगवेगळ्या लेखांचा संग्रह तर आहेच, पण सचिनच्या असंख्य फोटोंचं कलेक्शन देखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:00 pm

Web Title: sachin tendulkar birthday special portrait by mumbai fan pmw 88
Next Stories
1 बार्सिलोनाचा सुपर लीगला पाठिंबा कायम
2 दीपिका,अतानू उपांत्य फेरीत भारताच्या पाच पदकांची निश्चिती
3 जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धा : सचिनमुळे भारताचे सुवर्णाष्टक साकार
Just Now!
X