News Flash

टाळेबंदी नाही, कठोर निर्बंध

राज्यात महिनाभरात दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण

(संग्रहित छायाचित्र)

राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टाळेबंदी पुन्हा लागू करायची की निर्बंध अधिक कठोर करायचे, असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला. यावर सरसकट टाळेबंदी नको त्याऐवजी निर्बंध अधिक कठोर करण्यावर मंत्र्यांमध्ये सहमती झाली. तसेच राज्यातच रुग्ण जास्त कसे, अशी शंकाही या वेळी उपस्थित करण्यात आली.

करोनाचे रुग्ण वाढत असताना कोणते उपाय योजायचे याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्त रुग्ण असलेल्या काही शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात टाळेबंदी लागू करायची का, यावर बराच खल झाला. राज्यात सध्या सरासरी २५ हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण आढळत आहेत. हा कल असाच राहिल्यास टाळेबंदीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. टाळेबंदीऐवजी सध्या लागू असलेले  निर्बंध अधिक कठोर करण्यात यावे, अशी सूचना मंत्र्यांकडून करण्यात आली. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा अनुभव फारसा चांगला नाही. तसेच त्यातून आर्थिक गाडी रुळावरून घसरते. यामुळे टाळंबेदीचा सध्या तरी विचार होऊ नये, असेच सर्वांचे मत झाले. अगदीच शेवटचा पर्याय म्हणून टाळेबंदीचा विचार करता येईल, असाच मंत्र्यांचा सूर होता.

निर्बंध अधिक कठोर करण्याचे संके त देण्यात आले. यानुसार गर्दी टाळण्याकरिता काही कठोर उपाय योजण्यात येणार आहेत.  मुंबई, ठाण्यात रेल्वे प्रवासासाठी वेळेची काटेकोरपणे अंमलबजावणी के ली जाईल. यानुसार सर्वसामान्य प्रवाशांना दुपारी १२ नंतर आणि  रात्री ९ नंतरच प्रवास करता येईल. हॉटेल्स, बार रात्री उशिरापर्यंत उघडी ठेवता येणार नाहीत. व्यायामशाळा, तरण तलाव आदींवर निर्बंध लागू केले जाणार आहेत. होळीच्या सुट्टीच्या वेळी पर्यटनस्थळी गर्दी होऊ नये म्हणून कठोर उपाय योजले जाणार आहेत.

महाराष्ट्रातच एवढे रुग्ण कसे ?

आपल्या देशात किं वा अनेक राष्ट्रांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहेत. पश्चिाम बंगाल, तमिळनाडू, के रळ आदी निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये जाहीर सभांमध्ये मोठ्या प्रमाणावर गदी होते. पण रुग्णसंख्या महाराष्ट्रातच अधिक कशी, असा सवाल मंत्र्यांकडून करण्यात आला. के ंद्राने आतापर्यंत महाराष्ट्रात आठ वेळा पथके  पाठविली. केंद्र सरकारकडून दररोज नवी दिल्लीतील पत्रकार परिषदांमध्ये महाराष्ट्राचाच उल्लख के ला जातो. हे सारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कटकारस्थान तर नाही ना, अशी शंका काही मंत्र्यांनी व्यक्त केली.

रुग्णसंख्येत वाढ

मार्च महिन्याच्या २४ दिवसांमध्ये राज्यात २ लाख ३५ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. नोव्हेंबर १ लाख ४३ हजार, डिसेंबर १ लाख २० हजार, जानेवारी ९२,१७७, फेब्रुवारीत १ लाख ३१ हजार रुग्ण आढळले होते.

१ फेब्रुवारीला राज्यात १९४८ नवे रुग्ण आढळले होते. तर २४ मार्चला राज्यात एका दिवशी ३१ हजार रुग्ण आढळले. सध्या ६० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. यापैकी काही रुग्ण सर्रास बाहेर फिरतात व त्यातून संसर्ग वाढतो. म्हणूनच संस्थात्मक विलगीकरण करावे यावरही चर्चा करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2021 12:22 am

Web Title: sate no lockdown strict restrictions abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ५० टक्के उपस्थितीची कडक अंमलबजावणी
2 घराजवळ लसीकरणाची सुविधा द्या’
3 पुणे येथील कथित आत्महत्या प्रकरणी गुन्हा का नाही?
Just Now!
X