23 September 2020

News Flash

मनसेच्या स्टेजवर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा

मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बारकोडद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर भगव्या रंगाची रिबीन असलेले विशेष पास त्यांना देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर

मुंबईत होत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या तयारीदरम्यान अनेक नव्या गोष्टी पहायला मिळत आहेत. यातील एक विशेष बाब म्हणजे या अधिवेशनात स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. यांमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमाही ठेवण्यात आली आहे.

गोरेगाव येथील ज्या नेस्को मैदानातील सभागृहात हे अधिवेशन पार पडणार आहे. यावेळी मनसेचं रिलॉन्चिग होणार आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय क्षेत्रात लॉन्चिंग केले जाणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले जाणार आहे. यासाठी सभागृहात भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या स्टेजवर महापुरुषांच्या फोटोंमध्ये प्रखर हिंदुत्वाचे प्रतिक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पहिल्यांदाच ठेवण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांचाही यामध्ये समावेश आहे.

भगव्या रंगाची रिबीन असलेले विशेष पास

१८ हजार लोकांच्या बसण्याची क्षमता असलेल्या या सभागृहात मर्यादीत मनसे कार्यकर्त्यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी मनसेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बारकोडद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर भगव्या रंगाची रिबीन असलेले विशेष पासही त्यांना देण्यात आले आहेत. तसेच सभागृहाबाहेर भगवे झेंडे लावण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 9:25 am

Web Title: savarkars image for the first time on the stage of mns aau 85
Next Stories
1 अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग ? मनसे नेत्याने केलं स्पष्ट
2 आज मनसे अधिवेशनात काय होणार? जाणून घ्या ५ मुद्दे
3 मनसेच्या नव्या भूमिकेसाठी आशीर्वाद देणाऱ्या ‘या’ ज्येष्ठ शिवसैनिकाची सर्वत्र चर्चा
Just Now!
X