तूरडाळीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis आणि भाजपवर BJP पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राज्यात ४०० कोटींचा डाळ घोटाळा झाल्याची कबुली स्वत: मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ४०० कोटींचा घोटाळा होईपर्यंत पारदर्शक सरकार झोपले होते काय? असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे. तूरडाळ घोटाळ्याचे खापर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीवरही या सरकारला फोडता येत नसल्याचा टोला ‘सामना’तून लगावला आहे. हा डाळ घोटाळा ७०० ते ८०० कोटींचा असल्याचा आरोप करत तूरडाळीचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर माती खायची वेळ आली असल्याची खंत सेनेने व्यक्त केली आहे.
शिवसेनेने अग्रलेखात म्हटले, तूरडाळीचे उत्पादन जास्त झाले, त्यामुळे भाव कोसळले. हे सरकारकडून नेहमीचेच उत्तर मिळत आहे. सरकार बदलले पण शेतकऱ्यांबाबतचे धोरण आणि नियोजन साफ फसले आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेली तूरडाळ दलाल आणि व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने खरेदी केली आणि तीच डाळ हे व्यापारी सरकारी केंद्रावर चढ्या किमतीत विकत आहेत.
हवामानाचा अंदाज आला नसल्याचे खापर मुख्यमंत्री आता शेतकऱ्यांवर फोडत आहेत. सरकारकडे सर्व यंत्रणा असताना सरकारलाच याचा अंदाज यायला हवा होता. त्यांनी शेतकऱ्यांना सावध करायला हवे होते. ही सरकारची चूक आहे, असा आरोप करत या सरकारला राजकारणातले सर्व अंदाज बरोबर येतात. तेथे त्यांची चूक होत नाही, असा उपहासात्मक टोलाही लगावला.
सरकार अस्थिर झाले तर कोणते मासे गळाला लावायचे व त्यांना काय द्यायचे यांचा अंदाज सरकारी यंत्रणेचा वापर करून या सरकारला बांधता येतो. पण तूरडाळीच्या उत्पादनाचा आणि त्याच्या घोटाळ्याचा या सरकारला अंदाज कसा काय आला नाही ?. नाशिक, लासलगाव, सटाण्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस आल्याने पिके जमीनदोस्त झाली आहेत. द्राक्ष, डाळिंब, कांदा, गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी, गारपिटीचा अंदाज सरकारी यंत्रणेला आधीच आला असता तर शेतकऱ्यास पिके वाचवता आली असती, असेही शिवसेनेने म्हटले.

Uddhav Thackeray
“शिवसेनेला नकली सेना म्हणणाऱ्यांना…”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट प्रहार; म्हणाले “इंजिनाची चाकं…”
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/cats_ee077e.jpg
“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”
pm narendra modi manipur
“केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे… ”; मणिपूरमधील जातीय संघर्षाबाबत पंतप्रधान मोदींचे विधान
Kirit Somaiya shinde fadnavis
“या सरकारमध्येही घोटाळा होणार होता, पण…”, सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना घरचा आहेर; भाजपावरही आरोप