News Flash

शिवसेना भूमिकेवर ठाम, कसुरींच्या कार्यक्रमाला विरोध कायम

या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी शिवसेनेची मागणी

तेव्हा मोदींनी घाईघाईने पाकिस्तान दौरा करून काय साध्य केले, असा सवाल काँग्रेसकडून विचारण्यात आला आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा असलेला विरोध कायम असून, पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या प्रकरणात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत सोमवारी दुपारी व्यक्त केली.
ते म्हणाले, खुर्शिद मेहमूद कसुरी यांनी जरी आपण शांतीदूत असल्याचे सांगितले असले, तरी पाकिस्तानात सत्तेवर असताना त्यांनी भारताच्या विरोधात जी वक्तव्ये केली होती. २००३ पासून फुटीरतावाद्यांना पाठबळ दिले होते. त्या सर्वाचे पुरावे आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारताविरोधात कोणतेही वक्तव्य केले जाऊ नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयोजकांना दिले आहेत, असेही राऊत यांनी पत्रकारांना सांगितले.
कसुरी हे भारत सरकारच्या निमंत्रणावरून देशात आलेले नाहीत, असे स्पष्ट करून सुधींद्र कुलकर्णी यांच्यासारख्या पाकिस्तानी एजंटांनी त्यांना येथे आणले आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध कायम आहे आणि तो तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 4:31 pm

Web Title: shivsena continue to oppose kasuri book launch event
Next Stories
1 …तरच भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारतील – खुर्शिद मेहमूद कसुरी
2 शिवसैनिकांनी राष्ट्रभक्तीचा अंगार असाच पेटता ठेवावा- संजय राऊत
3 सुधींद्र कुलकर्णींवर ऑईलपेंट फेकण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट
Just Now!
X