घरातच थांबा, असे आवाहन सरकारी यंत्रणांकडून वारंवार करण्यात येत असतानाही, घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांकडून चोप देण्याचे प्रकार वाढल्याने त्याची नागरिकांमध्ये प्रतिक्रि या उमटू लागली. दांडुक्याचा धाक दाखवा, पण सामान्यांना त्याचा प्रसाद देऊ नका, असा सावधतेचा सल्ला भाजपच्या वतीने सरकारला देण्यात आला.  या संदर्भात काही मंत्र्यांनी पोलिसांच्या या कृतीबद्दल मुख्यमंत्र्यांकडे नापसंतीची भावना व्यक्त केली.

पहिले दोन दिवस तरुण टोळक्यांनी बाहेर पडत होती. त्यांना पोलिसांना चांगलाच चोप दिला. परंतु गेल्या दोन दिवसांपासून दूध किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांनाही पोलिसांच्या दांडुक्यांचा प्रसाद दिला जात आहे. दुध वाटप करणाऱ्यांनाही पोलिसांनी चोप दिल्याच्या तक्रोरी आल्या. भाजीपाला किं वा जीवनावश्यक वस्तू मुंबई, नवी मुंबईत पोहचविल्यावर नाशिकमध्ये परतताना काही ट्रक चालकांना पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकार घडले. जिल्हाबंदीचे कारण पुढे करून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी अडविल्याच्या तक्रारी मंत्रालयात आल्या आहेत. काही मंत्र्यांनी पोलिसांच्या दडपशाहीबद्दल मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त के ली. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे आधीच संतप्त असलेल्या नागरिकांमध्ये सरकारबद्दल विरोधी भावना निर्माण होत असल्याचे मत एका मंत्र्याने व्यक्त के ले.

परस्परविरोधी भूमिका

सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी के ले असताना किं वा नाहक नागरिकांना चोप देऊ नका, असे जाहीरपणे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करूनही पोलिसांवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट सर्वत्र पोलिसी खाक्याचा सर्रासपणे वापर सुरू आहे. मुख्मयमंत्री सबुरीने घ्या, असे आवाहन करी असताना गृहमंत्री अनिल देशमुख मात्र वृत्तवाहिन्यांवर पोलिसांचे दांडुके  दाखवत आहेत. जनता ऐकणार नसल्यास दांडुक्यांचा वापर करावा लागेल, असा इशारा देतात.

जनतेत संदेश जाण्यासाठीच

जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घोळका करू नका, अशी सरकारची स्पष्ट भूमिका आहे. पण राज्यात अनेक ठिकाणी लोक ऐकतच नाहीत, असा अनुभव पोलिसांना आला. यामुळे नाईलाजाने बळाचा वापर करावा लागतो, अशी भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली. यामुळेच वृत्तवाहिनीवरील मुलाखतीच्या वेळी आपण दांडुका दाखविला. लोकांनी बाहेर पडू नये एवढाच शासनाचा उद्देश आहे. बंद असल्याने तरुण दुचाक्यांवरून फिरायला निघतात. लोक विनवण्या करून ऐकत नाहीत. यातून दांडुका काय असतो याची आठवण करून द्यावी लागली, असे देशमुख यांचे म्हणणे होते.

जनतेने पुढील २१ दिवस घराबाहेर पडू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी के ले आहे. काही ठिकाणी लोक बाहेर पडत असल्याच्या तक्रोरी येतात. पोलिसांनी दांडुक्याचा धाक जरूर दाखवावा पण उगागच प्रसाद देऊ नये. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे ज्या पद्धतीने काम करतात तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रस्त्यावर उतरून काम करावे.

आशिष शेलार</p>