News Flash

वाशी, चेंबूरजवळ सिग्नलमध्ये बिघाड, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

सकाळी साडेआठच्या सुमारास झाला बिघाड

संग्रहित छायाचित्र

वाशी, चेंबूरजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास वाशीजवळ अप-डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे चाकरमान्यांना अडचणीचा सामना करावा लागला. गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान, तासाभराने म्हणजे दहाच्या सुमारास सिग्नलमधील हा बिघाड दुरूस्त करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरू झाली असली तरी वेळापत्रक अद्यापही विस्कळीत आहे.

लोकल सेवा मंदावल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 9:07 am

Web Title: signal problem in vashi chembur harbour line railway disturb
Next Stories
1 पंतप्रधानांचे ‘मौन’, चंद्राबाबूंचा संघर्ष सुरू; अविश्वास ठरावावरून सेनेचे मोदींवर टीकास्त्र
2 राज ठाकरेंच्या भाषणानंतर आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी गुजराती पाट्या हटवल्या
3 स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागण्या तथ्यहीन
Just Now!
X