गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या ‘विद्यार्थी विकास योजने’चा विस्तार करण्यात येणार आहे. गुणवान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील आर्थिक अडथळा दूर करण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे येणारे समाजहितैषी आणि विद्यार्थी यांच्यातील सेतूचे काम ही योजना करते. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या १४ जिल्ह्य़ांतील १७२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांच्या शैक्षणिक शुल्कासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये इतके आर्थिक साहाय्य मिळवून देण्यात आले. आतापर्यंत अशा साहाय्याचा लाभ मिळालेल्या सुमारे अडीचशे मुलामुलींनी शैक्षणिक प्रगती साध्य केली आहे. यापैकी काही परदेशातही आहेत. ‘सेवा सहयोग फाऊंडेशन ‘ या समविचारी विश्वस्त संस्थेसोबत संयुक्तरीत्या सी.एस.आर. (कंपन्यांचा सामाजिक सहभाग) निधी प्राप्त करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या दहावीत ९० टक्के तर बारावीत ८५ टक्कय़ांहून अधिक व प्रवेश परीक्षेत १२५ पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमात (अभियांत्रिकी, वैद्यकीय, वास्तुकला, परिचारिका प्रशिक्षण इत्यादी) प्रवेश घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच देणगी देऊ  इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्क

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

रवींद्र कर्वे- ९३२३२३४५८५, अरुण करमरकर – ९३२१२५९९४९, ( ठाणे, मुंबई ) प्रकाश भिडे, नाशिक – ९८३३७२९६२२, प्रदीप नणंदकर , लातूर – ९४२२०७१६६६, महादेव जाधव, रायगड – ९०४९६५६५२०, डॉ. प्रसाद देवधर, सिंधुदुर्ग – ९४२२५९६५००, विद्यानंद देवधर, कोल्हापूर – ९८२२३२५१३६, श्रीकांत पटवर्धन, सांगली – ९२२५८२५३९९, ज्ञानेश्वर गोल्हे, छत्रपती शिक्षण संस्था, कल्याण, श्रद्धा फडके, रत्नागिरी –  ९४२१५९०८०२, सुनील यादव, पुणे – ९८२२४१११८९