‘म्हातारपण’ हे शारीरिक आणि मानसिकही असते. कारण सत्तरी-पंचाहत्तरी पार केलेली मंडळी वयोपरत्वे थकली असली, वृद्धत्वाच्या खुणा शरीरावर दिसत असल्या तरी त्यातील काही जण मनाने तरुण असतात. त्या वयातही तरुणांनाही लाजवेल असा सळसळता उत्साह त्यांच्यात असतो. कोणत्या ना कोणत्या कामात त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतलेले असते. याच्या उलट काही तरुण मंडळी. वृद्धत्वाची कोणतीही लक्षणे शरीरावर दिसत नसली तरी हे तरुण किंवा चाळिशीच्या पुढची मंडळी मनाने मात्र ‘म्हातारी’ झालेली, उत्साह नसलेली किंवा फक्त ‘मी, माझा व कुटुंब’ यातच गुरफटलेली असतात. ठाणे येथील ७५ वर्षीय सुधाताई गोखले मात्र याला अपवाद आहेत. या वयात त्यांनी स्वत:ला वेगवेगळ्या सामाजिक कामात गुंतवून ठेवले आहे. सुधा गोखले या माहेरच्या सुधा आपटे. आधी वाणिज्य शाखेच्या पदवीधर (बी.कॉम) आणि नंतर कायद्याची पदवी (एलएलबी) घेतल्यानंतर त्यांनी बँक ऑफ इंडियात नोकरी करून २००० मध्ये बँकेतून ‘अधिकारी’ म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आता पैसे कमाविण्यासाठी काहीही काम करायचे नाही तर मिळालेला जास्तीत जास्त वेळ सामाजिक कामासाठी द्यायचा असे ठरविले होते.

कर्जतजवळ कोंडिवडे हे आदिवासी गाव आहे.येथे मुलुंड येथील स्मिता जोशी यांच्या ‘बांधिलकी’ संस्थेतर्फे काम चालते. तेथील मुलांना तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील इयत्ता ९ वी आणि १० वीच्या मुलांना त्यांनी इंग्रजी व्याकरण काही वर्षे शिकविले. त्यानंतर एकाकी आणि वृद्ध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या ‘माया केअर’ या स्वयंसेवी संस्थेच्या त्या संपर्कात आल्या. वृद्ध व्यक्तींच्या बँकेतील कामासाठी त्यांच्यासोबत बँकेत जाणे व पुन्हा घरी आणून सोडणे, दवाखाना, रुग्णालयात घेऊन जाणे, रुग्णालयात आजारी वृद्धांजवळ बसणे आणि वृद्धांना सर्वतोपरी मदत करणे अशी कामे संस्थेतर्फे केली जातात. सुरुवातीची काही वर्षे स्वयंसेवक म्हणून काम केल्यानंतर आता त्या संस्थेच्या समन्वयक म्हणून काम पाहतात.

gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Electricity Contract Workers, maharashtra, Promised Age Relaxation, Permanent Jobs, Yet to Be Fulfilled, nagpur, electricity workers, marathi news, devendra fadnavis,
कंत्राटी वीज कामगारांना वयात सवलतीचे आश्वासन ठरले ‘जुमला’ !
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

सुरुवातीला ज्या वृद्धांसाठी ही सेवा दिली जाते, त्यांच्याकडून नाममात्र शुल्क घेण्यात येत होते. आता या मदतीसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. ही सेवा पूर्णत: विनामूल्य दिली जाते. कार्यकर्त्यांचा प्रवास खर्च व त्यांचा अल्प मोबदला हा खर्च देणगीदारांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून केला जातो. ‘माया केअर’चे काम पूर्वी हैदराबाद, बंगलोर, चेन्नईसह नऊ मोठय़ा शहरांमध्ये सुरू होते. आता हे काम प्रामुख्याने मुंबई पुणे येथे चालते. संस्थेसाठी मुंबईत सहा तर पुण्यात २२ जण स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून काम करतात. मंजिरी गोखले-जोशी या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. काम करणारी स्वयंसेवक कार्यकर्ते मंडळीही वय वर्षे ५५ च्या पुढचीच जास्त संख्येत आहेत. ठाण्यात आत्ता दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी कार्यकर्त्यां म्हणून काम करत असल्या तरी तरुण स्वयंसेवक कार्यकर्ते खूपच कमी आहेत. या मंडळींनी आपापला अभ्यास, नोकरी, व्यवसाय सांभाळून काही वेळ तरी सामाजिक कामासाठी द्यावा, असे सुधाताईंचे सांगणे आहे.

नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी)च्या माजी कुलुगुरू डॉ. वसुधा कामत यांचे मामा डॉ. शरद्चंद्र कुलकर्णी  यांनी ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या इतिहासावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. आता ते त्यांचे आत्मचरित्र लिहीत आहेत. पहिल्या पुस्तकाप्रमाणेच ते आत्ता लिहीत असलेल्या पुस्तकासाठीही ‘माया केअर’चे स्वयंसेवक ते सांगतील तसे लेखन व डीटीपी करणे, लिहिलेला मजकूर त्यांना वाचून दाखविणे ही सेवा देत आहेत. ज्येष्ठ कथाकार व समीक्षिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांनीही एका कार्यक्रमासाठी घरून घेऊन जाणे, पुन्हा घरी आणून सोडणे यासाठी ‘माया केअर’ची मदत घेतली असल्याचे सुधाताईनी सांगितले.

सुधा गोखले यांची मैत्रीण मीना व यशवंत देवस्थळी यांनी जांभुळपाडा (खोपोली जवळ) येथे ‘चैतन्य’ वृद्धाश्रम सुरूकेला आहे. निराधार किंवा मुलांनी पाठवले म्हणून नाही तर स्वत:हून २२ वृद्ध येथे राहायला आले आहेत. महिन्यातून एकदा इथेही एक/दोन दिवस त्यांचा मुक्काम असतो. कार्यालयीन कामकाज पाहणे तर कधी वृद्धांसाठी ‘केअरटेकर’ म्हणून काम करणे अशी जबाबदारी त्या पार पाडतात. वृद्ध व्यक्तींच्या घरी जाणे, त्यांच्याशी गप्पा मारणे हेही त्यांचे काम सुरू असते. अंध विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तके व व्यवसाय यातील मजकुराचे ‘डीटीपी’ करून नंतर त्याचे ‘ब्रेल लिपी’त रूपांतर करण्याचे काम ठाणे येथील सुखदा पंत करतात. ‘प्रज्ञाचक्षु’ हे त्या अ‍ॅपचे नाव आहे. सुधाताई यांनी या उपक्रमातही ‘डीटीपी’चे काम केले. ठाण्यातील शुभांगी घाग या अंध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमातील पुस्तके ध्वनिमुद्रित करून देण्याचे काम करतात. येथेही सुधाताईनी मदतीचा हात पुढे केला आहे.

महाविद्यालयात असताना ‘युथ हॉस्टेल’ संस्थेबरोबर अनेक हायकिंग व ट्रेकिंग शिबिरात त्या सहभागी झाल्या होत्या. त्याचा फायदा मला आज या वयातही होत आहे. ते केल्यामुळे मी आज शारीरिकदृष्टय़ा ‘फिट’ असल्याचे त्या सांगतात. त्यांना प्रवासाचीही हौस आहे. प्रवासाचे सर्व नियोजन आणि आखणी करून स्वत:सह अन्य समवयस्क महिलांना सोबत घेऊन त्यांनी जॉर्डन, रशियाचा प्रवास केला आहे. कैलास मानसरोवर एकदा तसेच अमरनाथ (पायी) दोन वेळा त्यांचे झाले आहे.

वेळ नाही ही सबब अजिबात सांगू नका. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण यांनी दिवसातून काही वेळ तरी व्यायामासाठी द्यावा. पहाटे मोकळ्या हवेत फिरणे, घरच्या घरी किंवा व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करणे, पोहणे किंवा अन्य व्यायामप्रकार करावा, असे त्या आवर्जून सांगतात. मी सतत काही ना काही काम करत असल्याने नेहमी आनंदी व उत्साही असते. कंटाळा, आळस मला कधीच येत नाही, असेही सुधाताईंनी सांगितले.

सुधा गोखले 

http://www.mayacare.com

९५९४०७३४७५