News Flash

जीएसटीमुक्त सॅनिटरी नॅपकीन हा आपला मुलभूत हक्क – सुप्रिया सुळे

महिला सबलीकरणाच्या सर्व महत्वाच्या निर्णयात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे.

सुप्रिया सुळे (संग्रहित छायाचित्र)

सरकार स्वच्छ भारत अभियानाचा गाजावाजा करते. मात्र, महिलांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्यादृष्टीने महत्वाचा असलेला सॅनिटरी नॅपकीन जर GST मुक्त होत नाही. यावरून सरकारचा खोटारडेपणा दिसून येतो, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

संक्रांतीचा काळ हा महिलांसाठी विशेष आहे. मात्र, या कालावधीतही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला स्वत:च्या आरोग्यासाठी न्याय मागतात, ही महत्वाची बाब असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सॅनिटरी पॅडवरील GST रद्द करावा यासाठी सातत्याने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत पत्रव्यवहार सुरू आहे. महिला सबलीकरणाच्या सर्व महत्वाच्या निर्णयात महाराष्ट्राने पुढाकार घेतला आहे. GST मुक्त सॅनिटरी नॅपकीनसाठी आपण लढा देवू. हा फक्त महिलांचा प्रश्न नाही. या आपल्या लढ्यात संघटनेतले सर्व पुरूषही उपस्थित आहेत हेच समानतेचं लक्षण आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सॅनिटरी नॅपकीनवर लावलेला GST रद्द करावा, या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-माझगाव येथील सेल्स टॅक्स कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी स्पेशल कमिशनर पराग जैन यांना निवेदन देवून सॅनिटरी नॅपकीनवरील GST रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

ही लढाई ‘बॅडमॅन’च्या (सरकार) विरोधात – सचिन अहिर
आपली लढाई ही बॅडमॅन म्हणजेच सरकारच्या विरोधात असल्याचे वक्तव्य मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले. ‘पॅडमॅन’ या नवीन चित्रपटाचा नायक महिलांनी मासिक पाळीत स्वच्छता राखावी, यासाठी प्रयत्न करतो. तर आपले सरकार त्यावर GST लादून महिलांवर अन्याय करत असल्याचे मत अहिर यांनी व्यक्त केले. ही विचारांची लढाई आहे. जोपर्यंत सॅनिटरी पॅडवरील कर हटवला जात नाही, तोपर्यत राष्ट्रवादी काँग्रेस ही लढाई लढेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महानगरपालिकेच्या रूग्णालयात मोफत सॅनिटरी पॅड असणाऱ्या मशिन्स उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक आग्रही राहतील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 6:54 pm

Web Title: supriya sule gst sanitary napkin
Next Stories
1 मुंबई हल्ल्यातून बचावलेल्या मोशेची नेतान्याहूंनी घेतली भेट
2 भिवंडीतील मदरशात बिर्याणी खाल्याने २६ विद्यार्थ्यांना विषबाधा; ५ मुलांची प्रकृती गंभीर
3 बॉलिवूडची ‘डिटेक्टिव नानी’ काळाच्या पडद्याआड
Just Now!
X