News Flash

मुंबईत ७ व्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू

आज राज्यभरात पत्रकार दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे एका पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

आदर्श मिश्रा हे एका इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काम करत होते. त्यानंतर ते एका इंग्रजी नियतकालिकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

एका इंग्रजी दैनिकातील पत्रकाराचा इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. आदर्श मिश्रा असे मृत पत्रकाराचे नाव असून ही आत्महत्या की अपघात हे समजू शकलेले नाही. पोलीस तपास करत आहेत. गोरेगाव येथील सिद्धार्थनगर मधील ही घटना आहे.

आदर्श मिश्रा हे एका इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काम करत होते. त्यानंतर ते एका इंग्रजी नियतकालिकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मॉर्निंग वॉकसाठी ते दररोज राहत असलेल्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील गच्चीवर जात असत. नेहमीप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांचा ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या होती की अपघात हे अद्याप समजू शकलेले नाही. आज राज्यभरात पत्रकार दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे एका पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2019 12:52 pm

Web Title: suspicious death of the journalist collapse from the 7th floor of building
Next Stories
1 सहा दिवस मृत्यूशी दिली झुंज, वडिलांनी जिवंत जाळलेल्या ‘त्या’ मुलीचा अखेर मृत्यू
2 अदानीच्या वीजग्राहकांवर पुन्हा दरवाढीचे संकट
3 पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या दिवशीच उद्धव यांचा दुष्काळ दौरा
Just Now!
X