News Flash

तांत्रिक बिघाडामुळे मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोपर दरम्यान सीएसटीकडे जाणा-या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

| April 14, 2014 08:19 am

कोपर दरम्यान सीएसटीकडे जाणा-या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे धिम्या गतीच्या गाड्यांना जलदगती रेल्वे मार्गावर नेण्यात येत आहे. तसेच दिवा कोपर दरम्यान काही गाड्या न थांबल्याचेही वृत्त आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक सकाळीच कोलमडल्याने रेल्वे प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक केव्हा सुरळीत होईल, तसेच तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण मध्य रेल्वेने अजून न दिल्याने प्रवाशांत संताप व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 8:19 am

Web Title: technical failure in central railway
टॅग : Central Railway,Railway
Next Stories
1 राज्यात पारा चढला
2 उद्यापासून ‘मोनो’ सेवा १४ तास
3 टवाळा आवडे विनोद..
Just Now!
X