मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर शनिवारपासून नवीन वेळापत्रक

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते खोपोली, कसारा या मुख्य मार्गावर १४ डिसेंबरपासून उपनगरी रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. मेल-एक्स्प्रेस गाडय़ांमुळे बिघडलेला लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी ४२ लोकलच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. याशिवाय परळ स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आणखी काही फेऱ्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र या वेळापत्रकात हार्बर आणि ट्रान्स हार्बर प्रवाशांसाठी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

सकाळी ६.४८ ची कल्याण ते दादर, सकाळी ९.५४ ची टिटवाळा ते ठाणे लोकल आणि स. ११.१७ ची कल्याण ते दादर लोकल परळ स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तर दादर स्थानकातून सुटणारी सकाळी ८.०७ ची कल्याण लोकल परळ स्थानकातून ८.११ वाजता, सीएसएमटी स्थानकातून सकाळी ११.४२ वाजताची कल्याण लोकल परळ स्थानकातून त्याच वेळेत सुटेल, तर दादर स्थानकातून दुपारी १२.३७ वाजता सुटणारी डोंबिवली लोकल परळ स्थानकातून १२.३४ वाजता सुटणार आहे. ठाण्यापर्यंत धावणाऱ्या काही लोकल फेऱ्यांचा कल्याण, डोंबिवलीपर्यंतही विस्तार केला आहे. बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, टिटवाळा प्रवाशांनाही यातून दिलासा दिला आहे.